पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८


मी माझ्या फिरण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर करतो जर एसटी बसचा वापर शक्य नसेल तर मी खासगी बस वाहतूकदारांचा वापर करतो . अन्य खासगी वाहतूक साधनांचा वापर मी जवळपास शून्यच्या बरोबरीने वापर करतो. हे माझ्या प्रवासाबाबतच पुरेशी माहिती असणाऱ्या अनेकांना एव्हाना चांगलेच माहिती झाले असेल. जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीला मी एसटी बसचा चाहता आहे हे समजते त्यावेळी  काही वेळा  काय हे एसटी आवडू कशी शकते ? एसटी बस पेक्षा इतर प्रायव्हेट ऑपरेटर खूप ऊत्तम सेवा देतात. त्यांचा वापर करायला  काय जाते. पॆसे जवळपास सारखेच लागतात. या प्रतिक्रयेला मला सामोरे जावे लागते . काही जणांचा रोख सार्वजनिक बसवाहतुकी पेक्षा स्वतःचे वाहन काढून फिरण्यास प्राधान्य देण्यास असतो त्यांच्यामते कुठे बसची वाट बघायची बस ठीक ठिकाणी थांबत जाणार त्यात विनाकारण वेळ वाया जाणार तसेच बसमधील सहप्रवासी कसा असेल तो विक्षिप्त असेल तर काय सर्व प्रवाशाची मजाच जाणार . त्या पेक्षा स्वतःचे वाहन काढायचे हवे त्या ठिकाणी थांबायचे ते देखील हवे तेव्हडा वेळ .पूर्णतः स्वतःच्या मानाने फिरायचे 

 हे दोन्ही दृष्टिकोन त्यांच्या त्यांच्या चष्म्यातून योग्य असले तरी मला एसटी बसने फिरायलाच आवडते . माझ्या मते आपण ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत त्या ठकाणाशी पूर्णपणे एकरूप होण्याचा सुवर्णमार्ग म्हणजे एसटी बसमधून फिरणे. स्वतःच्या वाहनातून फिरल्यास स्थानिक जनतेशी जवळसपास शून्याच्या बरोबरीने संपर्क येतो. या पद्धतीने केलेले पर्यंटन म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन फोटो काढणे होय . जे  आजकालच्या ए आय च्या काळात घरी बसून देखील सहजशक्य आहे.मात्र अजून ए अय च्या मदतीने अनुभव घेता येणे

सहजशक्य नाही काही जण म्हणतील  सिम्युलेटिंगच्या मदतीने अनुभव सुद्धा घेता येतो मात्र त्या नुभवाची तुलना प्रत्यक्ष अनुभवासाशी करता येणे निव्वळ अशक्य  आहे . सिम्युलेटिंगचे अनुभव म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे  आपण ज्या ठिकणी फिरायला जाणार आहोत तेथील संस्कृती पूर्णपणे जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे त्या संस्कृतीशी शक्य तेव्हढे एकरूप होणे.त्या ठिकाणाच्या संस्कृतीची माहिती पुस्तकातून घेणे म्हणजे एकरूप होणे नाही ती नुआभावावावीच लागते आणि त्यासाठी अटक जनतेशी गप्प्पा मारायला लागतात .जर तुम्ही एखादे विशिष्ट  काम घेऊन जसे एखादी मिटिंग अटेंड करायची आहे फिरत असला तर स्वतःचे वाहन असणे एकवेळ क्षम्य आहे मात्र फिरायचे असेल तर सार्वजनिक वाहनशिवाय शक्य नाही असे मला वाटते मात्र जर कोणाला स्वतःचे वाहन घेऊन सुद्धा स्थानिक जनतेशी संवाद साधता येतो असे वाटत असल्यास मी त्याचे देखील स्वागतच करतो आपल्या हातची पाचही बोटे तरी कुठे सारखी असतात 

मी आतापर्यंत जो काही अनुभव घेतला आहे त्यानुसार (अर्थात तो परिपूतन आहे असे मला नक्कीच म्हणायचे नाही ) त्यानुसार खासगी बसेसपेक्षा एसटी बसमध्ये अधिक जास्त लोक अजून देखील प्रवास करते किंबहुना शहरी भागापेक्षा ग्रामीण  भागातीळ जनतेशी एकरूप होण्याचा मार्ग एस्टीक बसेसमधून जातो आजदेखील खरा


भारत ग्रामीणचे आहे आणि मला वैयक्तिक रित्या शहरणापेक्षा ग्रामीण भाग जास्त आवडत असल्याने मी एसटी बसेसचाच वापर फिरण्यासाठी जास्त करतो 

अर्थात मी करतो तेच बरोबर असे मला बिलकुल म्हणायचे नाही. आपला ,मार्ग वेगळा असला तरी पिंडे पिंडे मत भिन्नता या संस्कृत  श्लोकानुसार आपले मत या पेक्षा वेगळे असले असण्याची शक्यता मला मान्य आहे जर आपली मते माझ्यापेक्षा वेगळी असली तरी मला ती जाणून घेयला वाढेल मग सांगणार ना आपली मते 

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ७ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2026/01/7_11.html 

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ६ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/6.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ५ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा करा https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post_16.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ४ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ३ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2023/11/blog-post.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक २  वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2022/11/blog-post_26.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2020/02/blog-post.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -