पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव
आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.
तर मित्रांनो, मी माझ्या पर्यटनाच्या तयारीची सुरवात संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून त्या त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेवून करतो ,हे आपणास आता ज्ञात झाले असेलच.त्यानुसार माहिती घेत मी सांगली जिल्हा स्थळदर्शनासाठी निघालो असताना नाट्यमय प्रसंग घडला. त्यांचे झाले असे की, नरसोबाची वाडी हे देवस्थान सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी, प्रशासकीयदृष्ट्या ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर त्याची माहिती नव्हती, आणि मी सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा वेबसाइटवर आधारीत माझा स्थल दर्शनाचा
कार्यक्रम निश्चित केला होता.त्यानुसार शनिवारी रात्री पुण्याहुन येवून मिरज शहरात मुक्काम केला असता रविवारी मी लॉज मालकासी सहजच स्थल दर्शनाविषयी विचारणा केल्यावर त्याने नरसोबाची वाडीला जायला सांगितले नरसोबाची वाडी हे देवस्थान मोठे देवस्थान आहे.असे असून देखील जिल्हा वेबसाइटवर कसे नाही,याबाबत मी लॉज मालकाला विचारणा केल्यावर त्याने ते स्थान कोल्हापूर जिल्ह्यात असल्याचे सांगितले. लॉजमालकाशी बोलल्यामुळे मला एक महत्त्वाचे देवस्थान बघता आले.मी या प्रसंगावरून आपण एखादे पर्यटन स्थळ बघायला गेल्यास स्थानिकांशी बोलल्यास आपला फायदाच होतो हे शिकलो आपण देखील भलेही ऑनलाईन पद्धतीने आपला सर्व कार्यक्रम ठरवला असेल तरी स्थानिकांशी बोलल्यास फायदाच होईल,हे या प्रसंगावरून शिकू शकतात

अश्याच एका प्रवासादरम्यान आपल्या एसटीचा एक चमत्कारी अनुभव आला त्याच असे झाले की, मी एकदा पुण्यातून दौड शहरात फिरायला गेलो होतो मी त्या आधी काढलेल्या माहितीनुसार मी त्या ठिकाणी रेल्वेने गेलो मुळात मी एसटी प्रेमी असल्याने,. येताना शक्य झाले नसले तरी किमान जाताना तरी एसटी बसने जाऊ या
विचाराने मी माझे दौड शहर आणि परिसर बघून झाल्यावर मी तेथील एका रिक्षावाल्यास बसस्टँडवर घेऊन जाण्यास सांगितले , मी नवीन असल्याचे त्यास लक्षात आल्यामुळे. त्याने विचारले कुठे जायचे आहे ? मी त्यास पुन्हा सांगितले बसस्टँडवर यावर /त्याने मला सांगितले दौड शहरात एक ठराविक बस स्टॅन्ड नाहीये जर दौडहुन एसटीने कुठे जायचे असल्यास त्या रस्त्यावरच्या टोकाला उभे राहावे लागते आणि येणाऱ्या बसने प्रवास करावा लागतो तुम्ही नवीन दिसत कुठे जायचे ?मला तो रिक्षावाला प्रामाणिक वाटल्यामुळे मी त्यास पुण्यात जायचे आहे असे सांगितले त्या नंतर त्याने मला इच्छित स्थळी सोडले आणि मी पुण्यात आलो . प्रवासादरम्यान मी या विषयी चौकशी केल्यावर मला समजले कि खरच दौडला बॅस्टेन्ड नाहीये मात्र दौडला एसटीचा डेपो आहे बसस्टॅन्ड नाही मात्र डेपो असलेले दौड हे शहर एक चमत्कारच म्हणायला हवे बसस्टॅन्ड नसलेले मात्र रेल्वेची चांगली सोया असलेले अजून एक मोठे गाव मला माहिती आहे ते आहे कसारा . मात्र कसाऱ्याला डेपो नाहीये इथे डेपो आहे मात्र बसस्टँड नाहीये आहे कि नाही गंमत

मला एसटीच्या फिरण्यात अश्या अनेक गमती जमाती आढळतता त्याची माहिती वेळोवेळी आपणास लेखाद्वारे देतच असतो आतापर्यंत मी एसटीच्या सध्या बंद झालेल्या २०० रुपयाचा पस घ्या आणि वर्षभर एसटीच्या प्रवाश्यात १० % सूट घ्या हि योजना तसेच एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत नागपूर प्रशासकीय विभागवगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र, गोवा कर्नाटक आणि गुजरात राज्यता मनोसोक्त फिरलोय आपण देखील फार आणि आपले अनुभविश्व समृद्ध करा अनुभव विश्व समृद्ध करण्याचा या खेरीज दुसरा उत्तम उपाय नसेल माझे अनुभविश्व कसे समृद्ध झाले आहे हेआपल्यला समजावे या साठी माझ्या या आधीच्या लेखाच्या लिंक खाली देत आहे जे वाचून आपण देखील फिरायला उद्युक्त व्हाल अशी अशा आहे
पाचव्या भागाची लिंक
चवथ्या भागाची लिंक
तिसऱ्या भागाची लिंक
दुसऱ्या भागाची लिंक
पहिल्या भागाची लिंक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा