पर्यटनाच्या निमित्याने ......(भाग २ )

 


      केल्याने देशाटन शहाणपण येते असे आपल्याकडे म्हंटले जाते . आता ते कितपत खरे  वादाचा मुद्दा होऊ शकतो .मात्र विविध ठिकाणी फिरल्याने आपल्याकडे अनुभव मात्र खूप येतो याबाबत दुमत नसावे . मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून एसटीच्या विविध योजनांचा यथेच्छ फिरत आहे त्यामुळे या बाबत मी खात्रीने सदर गोष्ट १०० % खरी असल्याचे सांगू शकतो असो     मी एसटीच्या विविध  योजनेचा फायदा घेत आतापर्यंत विदर्भाचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेशमधील इंदोर परिसर , गुजरातमधील वापी वलसाड सुरत व्यारा , सोनागढ चिखली सापुतारा अंकलेश्वर , भरूच , बडोदा आदी ठिकाणी फिरलो आहे या प्रवासात  चमत्कारी  घटना अनुभवल्या आहेत 

  .  मी रत्नागिरी जिल्ह्यात कोणती पर्यटनस्थळे आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्था कशी आहे याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरून घेत असताना माहिती घेत असताना रत्नागिरीपासून नजीकचा विमानतळ हा पणजीच्या विमानतळ असल्याची माहिती मला मिळाली तुम्ही

म्हणाला यात गंमत ती काय ? तर मी त्यांना सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर मात्र जिल्ह्याला जवळचे विमानतळ म्हणून रत्नागिरी विमानतळ दाखवण्यात येत आहे .मात्र त्याच रत्नागिरीजिल्ह्यात जवळचे विमानतळ म्हणून पणजी दाखवण्यात येतोय रत्नागिरीहून पणजीत जात असताना मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा लागतो आहे कि नाही गंमत 

            या खेरीज गावाच्या साधर्म्यामुळे देखील अनेक गमतीजमती मी अनुभवल्या आहेत रायगड जिल्हयात महाड आणि महड अशी दोन गावे आहेत एका गाव अष्टविनायकचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर दुसरे ठिकाण गणपतीच्या मूर्ती तयार  करण्यासाठी प्रसिद्ध आहे काहीसा संयोग म्हणा किंवा दुर्दैव म्हणा या दोन्ही गावाचे इंग्रजी स्पेलिंग काहीसे सारखेच  होते मी पुण्यात असताना महाडला जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट जाण्यासाठी बसलो असता एक जण कंडक्टरला गणपती मंदिरापाशी उतरवा असे सांगत अष्टविनायकाचे स्थान  महडचे तिकीट काढू  लागला कंडक्टरने तुम्ही चुकीच्या गाडीत  आहात ही गाडी महाडला जात आहे महडला जात नाही अष्टविनायकाचे स्थान महडला आहे असे सांगितले महड आणि महाड या दोन्ही गावाचे  उच्चारण आणि इंग्रजी स्पेलिंग सारखेच असल्याने आणि दोन्ही गावे एकाच जिल्ह्यात असल्याने अनेकांचा होतो तसा त्याचा गैसमज झाला एका सहप्रवाश्याने याबाबत त्यांना योग्य माहिती दिल्यावर ते बसमधून उतरले 

      जग २१ व्या शतकात असले तरी काही जण अजून काही जण अजून १९ व्या किंवा २०व्या शतकातच असल्याचा अनुभव मला मध्यप्रदेश च्या एसटीमधून  अनेकदा आला आहे आपली महाराष्ट्र्र एसटी कॅशलेस पद्धतीने तिकीटे देत असताना मध्यप्रदेशाच्या बसमधील कंडक्टर बसमधील प्रवाश्याना गणपती उत्सवाच्या वेळी देणगी देणाऱ्या 

भाविकाला ज्या प्रमाणे मंडळाचा कार्यकर्ता पेनाने लिहून पावती देतो त्याप्रमाणे मध्यप्रदेश परिवहन असे छापलेल्या पावतीवर अजूनही पेनाने गावाचे नाव देऊन तिकीट देत आहे 

    आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणे, नाशिक ,औरंगाबाद , नागपूर  आदी आर्थिक समृद्धीची बेटे आहेत ती वगळता उर्वरित महाराष्ट्र हा बिहार सारखाच आहे असे अनेकदा  म्हंटले जाते  त्याचा अनुभव मी पुणे सोलापूर रेल्वे प्रवाश्यात घेतला मी प्रवास रात्री केला मला नेहमी खिडकीजवळची सीट आवडत असल्याने ती पकडून मी प्रवास करत होतो रेल्वेने कराड रेल्वेस्थेतून सोडून काही वेळ झाला होता अचानक डब्यात पोलीस येऊन खिडक्या बंद करायला सांगू लागले मी हे करावे लागत आहे याची माहिती घेतल्यावर घेतल्यावर समजले की या परिसरात रेल्वेवर दगड मारून रेल्वे थांबवतात रेल्वे थांब्यावर खिकीपाशी येऊन लूटमार केली जाते म्हणून या परिसराला खिडक्या आणि दरवाजे बंद करण्यास सांगितले जाते जणूकाही हा प्रदेश प्रगत अश्या महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये आहोत असा भास व्हावा 

माझे फिरतानाचे अनेक अनुभव आहेत ते वेळोवेळी आपणास सांगेलच तूर्तास इतकेच 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

मराठवाड्यातील एक दिवस