अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -


 आपल्या महाराष्ट्राला अत्यंत गौरवशाली इतिहास  लाभलेला आहे हे आपण जाणताचत्याचप्रमाणे अनेक भौगोलिक चमत्कार सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहेत . त्यामुळेच असेल कदाचित देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि हे सर्व जर आपणास एकाच वेळी बघायचे असेल तर .? आपणास महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला अर्थात अहमदनगर जिल्ह्याला भेट देणे क्रमप्राप्त आहेकाय नाहीअहमदनगर जिल्ह्यात ?संत ज्ञानेश्वर यांना लोकभाषेतून गीतेवरील भाष्य स्फुरले ते याच अर्थात अहमदनगर जिल्ह्यात अख्या भारताला सहकाराच्या मंत्र याच अहमदनगर जिल्ह्यातून देण्यात आलाकोळशाच्या राखेतून उभारलेले भारतातील पहिले धरण  भाटघर धरण हे याच जिल्ह्यातील . एक महत्वाचा नैसर्गिक चमत्कार असणारे 4 एकरावरील वडाचे झाड याच जिल्ह्यातील . या  अश्या विविधतेने नटलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात अहमदनगर शहराची बातच काही और . एकेकाळचे उत्कृष्ठ

शहरनियोजनाचा मापदंड ठरवणारे शहर म्हणजे अहमदनगर , आपल्या भारतातील सर्व प्रकारच्या  वाहन कंपन्यांना त्यांचे कोणतेही नवीन प्रकारचे वाहन  बाजारात आणण्याच्या अगोदर ज्या शहरातील VRDS  संस्थेची 
परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ते शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या महाराष्ट्रातील ज्या मोजक्या शहरांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यापैकी एक असणारे शहर म्हणजे अहमदनगर . तर अश्या अहमदनगर शहारला मी नुकतीच  फेसबुकवरील मित्रांच्या सहकार्याने एक दिवसाच्या पर्यटनातून  भेट दिली . त्या भेटीत मला जाणवलेले अहमदनगर तुमच्यापुढे मांडण्यासाठी आजचे लेखन

                   माझी ही  अहमदनगर शहारला भेट देण्याची दुसरी वेळ . पहिल्यांदा भेट दिली ती सुमारे दोन वर्षांपूर्वी .  त्या वेळेस शहरातील कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देता शहर बस वाहतुकीच्या बसेसमधून शहरभर फेरफटका मारला होता . मात्र यावेळी मी कटाक्षाने पर्यटन स्थळाला भेट देण्याचे ठरवून त्या साठी माहिती गोळा

करायला लागलो.  इंटरनेटवरून माहिती घेऊन एखाद्या शहारला भेट देण्याऐवजी ज्या शहारला भेट देयची आहे .त्या शहरातील व्यक्तींना माहिती विचारणे अधिक सोईस्कर असल्याचा माझा सांगलीला भेट दिल्यावरचा  पूर्वानुभव असल्याने मी त्यासाठी  लोकांकडून माहिती घेण्यासाठी फेसबुकवर अहमदनगर शहराच्या पर्यटन स्थळांविषयी माहिती विचारणारी पोस्ट केली . त्यावर माझे फेसबुक फ्रेंड फिरोझ खान  यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अहमदनगर शहरातील पर्यटनस्थळे सांगितली . अन्य काही लोकांनी देखील थोडीसी मदत केली मात्र मला या दौऱ्यामध्ये मला प्रचंड स्वरूपात मदत केली ती खान सरानी . त्यांनी माझ्यासाठी अहमदनगर शहरात राहण्यासाठी सोय केली .  माझ्यासाठी शहरदर्शन सोईचे

व्हावे म्हणून रिक्षाची देखील सोय केली .

              मी या अहमदनगर शहर पर्यटनानासाठी रविवार निवडला . अधिकाधिक वेळ शहर दर्शनासाठी

मिळवा यासाठी शनिवारी दैनंदैनिक कामे संपल्यावर शनिवारी रात्रीच मी अहमदनगरसाठी नाशिकहून प्रस्थान केले . नाशिकच्या बस स्टॅण्डवर आल्यावर गर्दीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस मला पकडता आली नाही . मला मिळाली ती गुजरात राज्य परिवहन महामंडळाची सुरतहुन बलसाड नाशिक करमाळा मार्गे पंढरपूरला जाणारी बस आणि माझा अहमदनगर दौऱ्याची सुरवात झाली . आता सुरत पंढरपूर या मोठ्या मार्गासाठी मला एकच डायव्हर दिसल्याने मी त्याबाबत कंडक्टर यांना विचारले असता असता त्यांनी मला सांगितले की संगमनेरनंतर जेव्हा बस खाण्यासाठी थांबेल त्यावेळी या डायव्हरची ड्युटी संपेल आणि काल या पर्यंत बस घेऊन आलेला डायव्हर पुढे बस मार्गस्थ करेल . आजचा डायव्हर उद्यापर्यंत येथे थांबून उद्या येणारी बस पुढे घेऊन जाईल  .तेव्हा माझ्या मनात  प्रश उपस्थित झाला आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे करू शकेल का ? सदर


बस लोणीनंतर कोलार येथे जाता बाभळेश्वर येथे आली आणि त्यांनी तिथे राहुरीसाठी एक प्रवासी घेतला . मी माझा माघारीचा प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने केला या बसने मात्र कोलार नंतर बाभळेश्वरला रामराम करत थेट  लोणीकडे प्रस्थान केले . अन्य राज्यांची परिवहन महामंडळे अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्य परिवहनाचे प्रवाशी असताना पळवत आपली एसटी ने आपले धोरण बदलेल का अशा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला अर्थात विषयांतर टाळण्यासाठी मी येथेच थांबवतो .

                                 माझ्या अहमदनगर शहरातील दिवसाची सुरवात झाली ती माझे फेसबुक फ्रेंड फिरोझ खान यांच्या बरोबर .  त्यांच्या बरोबर मी कापड बाजार या भागातील एका फूड स्टॉलवर पापड भाजी हा प्रकार खाला . त्यानंतर जवळच असणाऱ्या तेली चौक भागातील एका मिठाई दुकानात अहमगनगरची प्रसिद्ध अशी जिलेबी खाली . नंतर लगतच्या एका दुकानात चहापान केले . त्यानंतर खान सर त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे औरंगाबाद येथे गेले .त्यानंतर   मी त्यांना सुचवलेल्या रिक्षावाल्याबरोबर अहमदनगर शहराची भ्रमंती सुरु केली .  अहमदनगर शहराची भ्रमंती सुरु केली ती माळवाडी गणपतीच्या दर्शनाने . येथे गणपतीची मूर्ती मोठी असून ती  विशाल गणपती म्हणून ओळखली जाते . या ठिकाणी अन्य ठिकाणी सहजपणे दिसणारी फोटोग्राफीची मनाई असणारी पाटी मला आढळली नाही . त्यानंतर त्यानंतर मी भेट दिली ती


अहमदनगर शहर ज्या राजाच्या  नावावरून ओळखले जाते त्या अहमदशाहाच्या कबरीला भेट दिली जी कल्याण नगर रस्त्यावर भर नागरी वस्तीत आहे . मला येथे नमूद करताना अत्यंत वेदना होत आहे की , या कबरीची पुरेशी निगा राखण्यात आलेली नाही मुख्य कबरिची काही प्रमाणात निगा राखण्यात आली आहे . मात्र या कबरीच्या सभोवालतालच्या कबरीची अत्यंत दुर्दशा आहे . या  कबरींना लागून घरे आहेत . या कबरीच्या वाहनतळापासून कबरींकडे जाताना आपणास गटारीचे पाणी ओलांडावे लागते . अहमदनगर प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे . यानंतर मी मोर्चा वळवला तो अहमदनगर दौड रस्त्यावरील VRDS कडे . भारताच्या वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या या संस्थेत माहिती देणारे एखादे संग्रहालय असेल अशी माझी अपेक्षा होती मात्र त्या बाबत माझी निराशा झाली . प्रशासनाने या संस्थेची माहिती लोकांना होण्यासाठी या बाबत पाऊले उचलावी असे मला वाटते

. या नंतर मी बघितले ते अहमदनगर सोलापूर रस्त्यावरील सुप्रसिद्ध टॅंक म्युझियम आणि फरक्का पॅलेस .हि दोन्ही ठिकाणे बघण्यासाठी मला एकत्रितरित्या सुमारे अडीच तास लागले .टॅंक म्युझियम येथे माझ्या ओळखपत्राची पडताळणी करून मला प्रवेश देण्यात आला . सन 1994मध्ये उभारण्यात आलेल्या या म्युझियममध्ये एका मोठ्या मैदानात विविध रणगाडे ठेवण्यात आले आहेत . त्याच प्रमाणे तीन बंदिस्त सभागृहात भारतीय लष्कराविषयी विविध प्रकारची माहिती देणारी प्रदर्शने आहेत . हे म्युझियम गाडी तळापासून बऱ्याच आतमध्ये उभारण्यात आले आहे . गाडीतळ ते टॅंक म्युझियम या रस्त्यावरच  एके ठिकाणी आपणस फराक्का पॅलेस कडे जाण्यासाठी रस्ता दिसतो . त्या रस्त्याने दोन एक  मिनिटे पायी चालल्यावर दोन मजल्याची एक वास्तू आपल्याला दिसते तोच फरक्का पॅलेस .

पॅलेस धोकादायक स्थितीत असल्याने येथील जिन्यावर प्रवेशबंदी आहे . आपणास तळमजल्यावरच फिरता येते .  त्यानंतर पुन्हा माळवाडी बसस्थानक परिसरात येउन मी क्षुधाशांती केली . आणि अहमदनगर शहर पर्यटनासाठी अखेरच्या टप्यात प्रवेश केला या टप्यात मी अहमदनगर कॅम्प भागातील सुप्रसिद्ध भुईकोट किल्ला बघून माझ्या अहमदनगर पर्यटन दोऱ्यांची सांगता केली .

माझ्या आधीच्या अहमदनगर दौऱ्याच्या वेळी आणि आता सुमारे दोन वर्षानंतर केलेल्या दोऱ्याच्या वेळी मला               अहमदनगर शहारत अनेक बदल दिसले . याच्या आधी केलेल्या दौऱ्यात मला अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर बस वाहतुकीच्या खूप बसेस दिसल्या होत्या . यावेळी त्यांची संख्या कमी होती . मागच्या वेळेपेक्षा या वेळी शहर वाहतुकीला बऱ्यापैकी शिस्त असल्याचे मला दिसून आले .त्याबद्दल समस्त अहमदनगरकारचे अभिनंदन

 अहमदनगर शहर मला फिरताना खूप छान वाटले . मी या शहारला पुन्हा एकदा नक्कीच भेट देणार आहे . आपण हि या  ऐतिहासिक शहारला किमान एकदा तरी भेट द्यावी . मग कधी जाता आहात अहमदनगर शहारत फिरायला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

मराठवाड्यातील एक दिवस