पोस्ट्स

एसटीच्या मार्फत फिरलेले लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुणे शहराचे विविधांगी सांस्कृतिक दर्शन घडवणारा भाग 'सिंहगडरोड'

इमेज
मी पहिल्यांदा शिक्षणासाठी आणि नंतर नोकरी निमित्ताने पुणे शहरात आलो. त्याला आता ४ते५ वर्षांहुन जास्त दिवस होऊन गेले आहेत.मात्र रोजच्या आयुष्यात बिझी असल्याने म्हणा किंवा अन्य काही अडचणींमुळे म्हणा पुणे शहराचा एक अत्यंत मर्यादित भाग असलेल्या टिळक रोड, सदाशिव पेठ पलीकडे फारसे पुणे शहर फिरलो नव्हतो.नाही म्हणायला काही न्युजपेपरमध्ये पुणे शहरातील विविध उपनगरांचा पेठांतील गमतीजमंती मात्र आवर्जुन वाचायचो. मात्र जसे काठावर उभे राहुन पोहणे शिकण्यात मज्जा नाही.तसेच फक्त याविषयी वाचून काही अर्थ नाही,या गोष्टी स्वत: अनुभवायला हव्यात,हेही समजत होते. त्यावेळी कधीना कधि या गोष्टी स्वत:अनुभवयाचा हे मी ठरवले होते.मात्र त्यावेळी काही कारणाने ते शक्य झाले नाही.आता पुणे शहरात बराच काळ काढल्यावर नोकरीत बऱ्यापैकी स्थैर्य आल्यावर मी ठरवून वेळ काढत पुणे शहरातील विविध भागांना भेट देत असल्याचे तूम्हाला माहिती झाले असेलचं तर याच मालिकेत मी नुकतीच सिंहगड रोड परिसराला भेट दिली त्यासाठी नेहमीप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पी.एम.पी.एम.एल.)चा एक दिवसाचा पास काढला.सकाळी लवकरच मी स्वारगेटहुन सुरूवात केल...

अनेक लष्करी आणि देशासाठी महत्त्वाच्या संस्थांचे माहेरघर- पुणे (भाग 1)

इमेज
आपण ज्या शहरात राहतो, त्या शहराची किमान आपल्याला तोंड ओळख असावी, या हेतूने मी सध्या ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पुणे शहरातील विविध भागांना पीएम पीएल बस, मेट्रो आणि स्वतःची गाडी या माध्यमातून भेट देत आहे. हे आपणास एव्हाना माहिती झालेच असेल.  माझ्या याच भटकंतीमध्ये मी नुकतीच मी नगर रोडवरील कल्याणी नगर, येरवडा, वडगाव शेरी, चंदन नगर, आदी भागातून भोसरी मोशी या भागात तसेच पुढे निगडी, चिंचवड, खडकी भागात जायचे ठरवल्यास कोणकोणते भाग येतात ? तसेच या भागात प्रवास करायचा असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा काय सोय आहे या प्रकारची माहिती घेण्यासाठी  पी एम पी एल च्या 149 क्रमांकाच्या बसने एका दिवसाचा पास काढून भटकंती केली. या 149 बस क्रमांकाच्या भटकंतीमुळे मला पुणे शहराची एक नवी ओळख प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लष्करी आणि अन्य महत्वाचा संस्थेचे माहेरघर असणारे पुणे शहर. सर्वसाधारणपणे बोलायचे झाल्यास पुणे शहरातील लोहगाव आणि विश्रांतवाडी भागात लष्कराची काही ऑफिसेस आहेत अशी सर्वसाधारण माहिती अनेकांना असते. मात्र ती कोणती आहेत, किती आहेत याविषयीची माहिती अनेकांना नसते. मला सुद्धा नव्हती. मात्र मी...

एक दिवस रावसाहेबाच्या नगरीत

इमेज
मराठीतील एक ख्यातनाम सिद्धहस्त लेखक म्हणून आपण पु. ल. देशपांडे  यांना ओळखतो.  पु. ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ या लेखनासह त्यांनी आपल्या प्रतिभेने साकरलेली व्यक्तिचित्रे सुद्धा मोठ्या संख्येने प्रसिद्व आहेत.या व्यक्तिचित्रांपैकीच एक म्हणजे सहज बोलता बोलता  शिव्या देणारे, प्रचंड तिखट खाणारे मात्र आतुन अत्यंत प्रेमळ स्वाभाव असणारे बेळगावचे रहिवासी रावसाहेब. बेळगाव,  आपल्या मराठी भाषिकांची अस्मिता, जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजे बेळगाव.तर या बेळगावला मी नुकतीच माझ्या 'एक दिवशीय भ्रमंती' या उपक्रमाद्वारे भेट दिली. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे सार मंडण्यासाठी प्रस्तूत लेखन तर वाचक मित्र मैत्रींणोंनो, माझ्रा एकदिवशीय भ्रमंतीची सुरवात नेहमीप्रमाणे झाली ती रात्री अकरा वाजता, पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या शिर्डी -बेळगाव नॉन एसी स्लिपर बसने. या बसने प्रवास करत पावणे सहाच्या सुमारास मी बेळगावच्या बसस्टँडवर पोहोचलो.बेळगावचे बसस्टँड मोठे असून या ठिकाणी ३७ प्लॅटफॉर्म आहेत.मी गेलो त्यावेळी नुकतेच उजाडत होते.माझ्या आतापर्यंत अनुभवानुसार परक्य...

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे

इमेज
  आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात पर्यटनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो.  लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने बाहेर काढण्यासाठी अध्यात्म, पुण्याचे संकलन आदी संकल्पनाच्या आधार घेत विविध धार्मिकस्थळे निर्माण केलेली आहेत. .त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडगाव कांशबिंगे हे साडेतीन गणपतीपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थान होय. या स्थानाला मी नुकतीच भेट दिली.मनाला नवी ऊर्जा देणारा अनुभव होता तो  हो,, !  गणपतींची सुद्धा साडेतीन स्थाने आहेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांना मी काहीतरी चुकीचे सांगतोय साडेतीन स्थाने तर देवीची आहेत गणपतीची नाहीत असे वाटू शकतो . माझा अष्टविनायक आणि देवीची साडेतीन शक्तिपीठे यामध्ये गल्लत झाली तर नाहीना असे वाटू शकते .तर त्यांना माझे सांगणे आहे की हो गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत. गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे.गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध  केल्याने त्या राक्षसाच्या इच्छेनुसार गणपतीला मयुरेश्वर हे नाव मिळाले तर या मयुरेश्वर या नावाच्...

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

इमेज
जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली‌.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.      आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो‌. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते‌.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही‌. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.      वलसाड...

रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'

इमेज
 रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन                   तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन, पर्यटन करत असे  मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती.  मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०...

पर्यटनाची अपार क्षमता मात्र दुर्लक्षित जिल्हा लातूर

इमेज
     आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या ३६ जिल्ह्याचा विचार केला असता  प्रत्येक जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत पर्यटनस्थळांनी आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा समृद्ध आहे .  लातूर सारखा क्षेत्रफळाचा दृष्टीने छोट्या जिल्ह्यात मोडणारा महाराष्ट्राचा एका कोपऱयात असणारा जिल्हा देखील त्यास अपवाद नाहीये . लातूर या जेमतेम पाच तालुक्याच्या  जिल्ह्यात दोन भुईकोट किल्ले , एक लेणी ,एक निसर्ग पर्यटन केंद्र ,एक बालाजीचे मंदिर  , दोन महादेवाची मंदिरे  एक मनमोहक गार्डन , आदी पर्यटनस्थळे आहेत .एसटीचा आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत  नुकतीच या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या  माझ्या या प्रवाशाची सुरवात नेहमीप्रमाणे शनिवारी झाली . शनिवारी पहाटे सकाळी सहा वाजता नाशिक लातूर या बसने मी लातूरसाठी निघालो नाशिकहून लातूरला दोन मार्गे जाता येते एका मार्ग हिंगोलीमार्गे  आहे तर दुसरा मार्ग आंबाजोगाईमार्गे आहे मी नाशिकहून लातूर आणि परत नाशिक या दोन्ही वेळेस  आंबाजोगाईमार्गे प्रवास केला या साठी मला मला नाशिकहून लातूर प्रवासासाठी सव्वा बारातास  तर लातूरह...

पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नशील मात्र दुर्लक्षित जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा )

इमेज
         आपला महाराष्ट्र पर्यंटनस्थळाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे . राज्याचा असा कोणताही जिल्हा नाही कि ज्यात पर्यटनस्थळ नाही कोल्हापूर पासून नंदुरबार आणि मुबई शहर पासून गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यात आपणास पर्यटन स्थळे आढळतात . मात्र काही जिल्हे खास पर्यटनासाठी ओळखले जातात तर काही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसे अपरिचित आहेत परुंतु त्या जिल्ह्यत पर्यटनस्थळे नाहीत असे नाही अश्याच पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा अपरिचित मात्र पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्धी होण्यासाठी धडपडणारा जिल्हा म्हणजे  उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा ) ,महाराष्ट्रात पालघर या जिल्ह्याच्या अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याची जिल्ह्याचे नाव नंतर एनआयसी इन या डोमिन नेमखाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे (पालघरला डोमेन नेम जीओव्ही इन आहे )  ज्यामध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिलेली असते  तशीच ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे . मात्र उमसनबाद जिल्ह्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती हितालुक्यानुसार  देण्यात आली ...

संत नामदेव आणि साइबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेले जिल्हे हिंगोली आणि परभणी

इमेज
  आपल्या महाराष्ट्रातील काहीसा अविकसीत समजल्या जाणारा मराठवाडा मात्र अध्यात्मिक क्षेत्रात मात्र महाराष्ट्राच्या अन्य भागापेक्षा खुपच जास्त श्रीमंत आहे . आख्या भारतात असणाऱ्या 12 ज्योतीलिंगापैकी 3 ज्योर्तीलिंगे , देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी 2 पुर्ण पीठे , संत ज्ञानेश्वर , संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई , संत नामदेव साईबाबा , संत रामदास स्वामी अस्या अनेक संताची जन्मभुमी , गणेश पुराणात सांगितलेल्या गणपतींच्या साडेतीन पीठांपैकी एक पुर्ण पीठ राजूर , इस्लाममधील भक्ती चळवळ म्हणता येईल असी सुफी चळवळीत महत्तावाचे स्थान असणारे दर्गे मोठ्या संख्येने असणारा प्रदेश म्हणजे मराठवाडा , शिख बांधवांच्या पवित्र पाच स्थानांपैकी एक असणारे नांदेड देखील मराठवाड्यातच येते . याच मराठवाड्यातील साईबाबांच्या जन्माने आणि संत नामदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली त्यावेळी मला आलेले अनुभव आपणास सांगण्यासाठी आजचा लेखन प्रपंच . तर मित्रांनो आपण अन...