वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ
जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.
आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वलसाड म्हटले की अनेकांना फक्त सापुताराच आठवते .मात्र वलसाड जिल्ह्यात सापुताराखेरीज परनेरा हिल्स, तिथल बीच, स्वामी नारायण मंदिर यासारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत असो.
मी साधरणत: शनिवारी रात्री प्रवास सुरु करतो.रविवार पुर्ण स्थलदर्शनासाठी वापरतो आणि रविवार सायंकाळी रात्री परतीचा प्रवास सुरू करून सोमवार पहाटेपर्यत घरी पोहचून सोमवार सकाळपासून नित्य व्यवहाराला सुरवात करतो.यावेळी मात्र मी ऑफिस आणि काही वैयक्तिक अडचणीमुळे १ ऑगस्ट शुक्रवारी रात्री प्रवास करत सुरू करत शनिवार २ऑगस्टचा दिवस पर्यटनासाठी वापरला.माझ्या प्रवाश्याची सुरवात झाली नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातून पुणे -बडोदा या महाराष्ट्राच्या एसटी बसने. पुण्याहुन बडोदा कडे निघाल्यावर पुणे नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे बस नाशिकला दोन तास उशीरा पोहोचली खरी.मात्र उशीरा आल्यामुळे माझा पर्यटनावर काहीही परिणाम झाला नाही.किंबहुना उत्तर रात्री (रात्री दोन अडीच पासून रात्री चार साडेचारपर्यतच्या कालावधीस उत्तर रात्र म्हणतात) वलसाडला पोहोचून तिथे नुसत बसण्यापेक्षा पहाटेच्या सुमारास पोहोचल्याने माझा एकप्रकारे फायदाच झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
तर पहाटे वलसाडला पोहोचल्यावर चहा पिणे पोहे वगैरे खावून झाल्यावर माझ्या पर्यटनाची सुरवात झाली. मी वलसाडला पोहोचल्यावर कोणती पर्यटनस्थळे आहेत याची इंटरनेटच्या मदतीने काढलेल्या माहितीनुसार परनेरा हिल्स या ठिकाणी सुर्योदय आणि सुर्यास्तावेळी जाणे उत्तम असल्याने आणि वेळ सुर्योदयाचीच असल्याने माझा मोर्चा परनेरा हिल्सकडे वळाला. परनेरा हिल्स वलसाड शहरापासून ६किलोमीटरवर आहे. गुजरात राज्य परिवहनाच्या बाहेर गावी जाणाऱ्या बसमधून या ठिकाणी आपणास जाता येते. वलसाडहुन कापराडा या ठिकाणी जाणाऱ्या बसने आपण सुमारे १५ ते २० मिनीटात येथे पोहोचतो. नाशिकहुन वलसाडला पेठनंतर दोन मार्गाने पोहोचता येते एक मार्ग धरमपूरहुन आहे.दुसरा मार्ग कापरडाहुन आहे.कापरडामार्गे आल्यास वलसाडच्या आधीच परनेरा हिल्स येतात. नाशिक आणि पुण्याचा संदर्भ देवून बोलायचे झाल्यास सव्वा ते दिड पांडवलेणी, चतूश्रुंगी इतक्या उंचीची ही टेकडी आहे. टेकडीवर भगवान शंकराचे एक आणि देवीची २ मंदिरे आहेत.सभोवतालचा परिसर निसर्गाची उधळण करणारा आहे टेकडीच्या पायथ्यापासून पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत .ज्या उंचीला जेमतेम ५ सेंटीमिटरच्या असल्याने आपण सहजतेने टेकडी चढु शकतो. मुख्य रस्त्यापासून टेकड्या सुमारे पाउण ते एक किलोमीटर आत आहेत. वलसाडहुन परनेरा हिल्स या ठिकाणी बस न मिळाल्यास शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे
वलसाड ते परनेरा हिल्स रस्त्यावरच अजून एक पर्यटन स्थळ आहे. सोमनाथ महादेव मंदिर. नाशिकच्या सोमेश्वर मंदिरासारखा हा परिसर आहे.मी परनेरा हिल्सहुन वलसाडला येताना या ठिकाणी भेट दिली.
या दोन ठिकाणाला भेट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात भुक लागल्याने मी मोर्चा खाण्याकडे वळवला. एसटी बस स्टँडहून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाण्याची सोय सहजतेने होवू शकते. पेटपुजा केल्यावर मी मोर्चा वळवला तो तिथल बीचकडे.
वलसाड शहरातून तिथल बीचवर जाण्यासाठी गुजरात राज्य परिवहनाच्या वलसाड शहरात फिरणाऱ्या बसेस उपलब्ध आहेत.या सिटी बसेसच्या १ क्रमांकाच्या बसने दहा ते पंधरा मिनीटात आपण बीचवर पोहोचतो. एसटी स्टँडच्या बाहेर आल्यावर डाव्या बाजूला दोन ते तीन बिल्डींग सोडल्यावर एका छोट्यासा जागेत सिटी बसचे स्टँड आहे.बसेसची फ्रिक्वेन्सी दर तासाला एक बस असी सांगत असले तरी माझ्या मते ती दिड ते २तासाला एक इतकी कमी आहे.
तिथल बीच तेथील काहीस्या काळ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे.बीचवर मला सुरक्षारक्षक आढळले नाहीत.मात्र गणपतीपुळे, सुरत सारखा येथील समुद्र किनारा धोकादायक नाही.आपण सहज या ठिकाणी समुद्राचा आनंद घेऊ शकतो. तिथल बीचचा बसच्या स्टॉपपासून पुढे अर्धा ते पाऊण किलोमीटरवर समुद्र किनारीच स्वामी नारायण मंदिर आहे. आपण बसस्टॉप पासून पायी पायीं समुद्राचा आस्वाद घेत सहजतेने मंदिरात पोहोचू शकतो. १ क्रमांकाच्या सिटी बसचा स्वामी नारायण मंदिर हा शेवटचा स्टॉप आहे. मंदिराचे आपण बाहेरून सहज फोटो व्हिडीओ घेवू शकतो.आतमध्ये मात्र परवानगी नाहीये .
या दोन ठिकाणी भेट दिल्यावर मी मोर्चा वळवला तो तिथल बीचच्याच ठिकाणी असलेल्या साईबाबा मंदिराकडे मंदिर सुद्धा समुद्र किनाऱ्यावरच आहे. तिथलं बीचचा जो बस स्टॉप आहे त्याच्या आधीचा स्टॉप म्हणजे साईबाबा मंदिराचा स्टॉप. जो बीचच्या स्टॉपच्या एक ते दीड किलोमीटर आधी आहे.मंदिर परिसरात राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.
मात्र मी आधी सांगितले त्याप्रमाणे येथील बससेवा तोकडी असल्याने रिक्षाचाच आधार घ्यावा लागतो.
साईबाबा मंदिर बघितल्यावर मी वलसाडला आलो. तेथून धरमपुरला जाऊन तेथून १५किलोमीटरवर असलेला शंकर धबधबा बघण्याचे माझे नियोजन होते.मात्र वलसाड ते धरमपूर बस प्रवाश्यात सहप्रवाश्याने दिलेली माहिती आणि उपलब्ध वेळ यामुळे मला ते ठिकाण बघण्याचे रद्द करावे लागले.त्यामुळे मी धरमपूरला येवून गाव बघितले आणि माघारी आलो.
वलसाड आणि धरमपूरला मला दुकानाच्या पाट्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत लिहलेल्या आढळल्या. मी याच्या आधी अहमदाबाद बडोदा आणंद या शहरात फिरलो आहे. तेथील जवळपास ९० ते ९५ टक्के पाट्या या गुजराती भाषेत लिहलेल्या मला दिसल्या होत्या.त्या पार्श्वभुमीवर वलसाड आणि धरमपूर शहरात इंग्रजीत दुकानाच्या पाट्या आढळणे खुप उत्तम गोष्ट म्हणता येईल.
वलसाड शहरात नगरपालिका आहे.तसेच शहर मोठ्या प्रमाणात स्वच्छ आढळले.तीच काहीसी गोष्ट धरमपूरची.धरमपूर शहर मात्र वलसाडच्या तूलनेत कमी स्वच्छ दिसले.
मला प्रवाश्यात आढळलेली गोष्ट म्हणजे शेजारचा जिल्हा असून देखील नाशिक आणि वलसाड जिल्ह्यादरम्यान दोन्ही राज्याचा विचार करुन सुद्धा जवळपास नाहीच असी म्हणता येईल असी सार्वजनिक बस वाहतूक जीचा मला देखील फटका बसला.नंदूरबार ,धुळे या जिल्ह्यातून गुजरातला अतिशय मोठ्या प्रमाणात बसवाहतूक आहे. तितकी नसली तरी काही प्रमाणात बस वाहतूक वाढणे आवश्यक आहे.दोन्ही राज्याचा मिळून या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या फक्त ७ बसेस आहेत.
मी सार्वजनिक बसवाहतूकीच्याच मार्गाने जास्त वेळ फिरत असल्याने मला त्यांचा वेळापत्रकानुसार कार्यक्रम आखावा लागतो.ज्याला या कमी बसेस मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात.यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
बाकी वलसाड जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत उत्तम आहे हे नक्की .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा