पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह_ड_प_स_र पुणे शहराचे अप्रतिम उपनगर (भाग १ )

इमेज
आपल्या मनुष्याच्या स्वभाव मोठा विलक्षण आहे.  मनुष्य त्याच्या जवळ जे आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि दुसऱ्या ठिकाणच्या वस्तूचा शोध घेतो . जर  आपण मानवी स्वभावाचे तटस्थ पद्धतीने निरीक्षण केले तर मानव प्राण्याने हा नियम सर्व ठिकाणी वापरला असल्याचे लक्षात येते अगदी आपण राहतो त्या प्रदेशाला सुद्धा हा नियम लावल्याचे आपण सहज दिसून येते. आपण काय इथेच राहतो हा भाग कधीही बघता येईल, या  समजुतीतून आपण राहतो त्या शहरातील अनेक भाग ना बघितलेले सुद्धा आपणास अनेक जण सापडू शकतात. किंबहुना आपण राहतो आणि आपण व्यवसाय, नोकरी करतो त्या परिसरात बघण्यास फारसे काही आढळलेले  नसल्याने  (मुळात तो त्यांचा दोष असतो, त्या भागात देखील अनेक बघण्याचे भाग असतात मात्र रोजच्या जगण्यात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा तशी दृष्टी नसल्याने त्यांना ते सापडत नाहीत )  शहराच्या इतर भागात देखील तसेच असल्याचे वाटून जाते आणि ते एका मोठ्या खजिन्याला मुकतात.  माझ्याकडून ही  चूक होऊ नये म्हणून मी पुणे शहराचे एक अप्रतिम उपनगर असलेल्या हडपसरला नुकतीच भेट दिली. हडपसर उपनगर पर्यटनाच्या निमित्ताने...

सुरुवात एका नव्या पर्वाची थेऊरच्या अष्टविनायकाच्या दर्शनाने

इमेज
  मी जे फिरतो, त्याविषयी माझ्या मित्र परिवारात  जेव्हा चर्चा होते त्यावेळी  एक मुद्दा अनेकदा चर्चेस  येतो ,तो म्हणजे मी एसटी बसने का फिरतो? .स्वतःच्या  टू व्हीलरवर  का फिरत नाही ?  .माझे काही मित्र मला अनेकदा सांगत असतात. अजिंक्य आम्ही तुझ्या बरोबर फिरायला येऊ पण ती एसटी बस नको रे ! ठीक ठिकाणी थांबत जाण्यापेक्षा आपल्या टू व्हीलरने गेले कि मस्त सारखे थांबायला नको .एकदा निघालो कि थेट सुसाट.बरे मध्ये थांबावेसे वाटले कि थांबायचे ते देखील हवा तेव्हढा वेळ . निघायची घाई नाही आपल्याला हवा तसा प्रॉग्रॅम आखता येतोस्वतःच्या गाडीमुळे. चल निघायचे का ?  मात्र अनेक कारणांनी मी एसटी बसने फिरण्याचे काही सोडत नव्हतो. टू व्हीलरने काही फिरायला जात नव्हतो. मात्र कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्रासदायक वाटते .एकदा केल्यावर त्यातील भीती मोठ्या प्रमाणात पळून जाते असे म्हंटले जाते. याचाच प्रत्यय मला नुकताच आला स्वःता टू  व्हीलर चालवत मी नुकतेच पर्यंटन पूर्ण केले.   कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपल्याकडे देव दर्शनाने करण्याची आपल्याकडे पद्धत आहे माझ्या या नव...

एक दिवस रावसाहेबाच्या नगरीत

इमेज
मराठीतील एक ख्यातनाम सिद्धहस्त लेखक म्हणून आपण पु. ल. देशपांडे  यांना ओळखतो.  पु. ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ या लेखनासह त्यांनी आपल्या प्रतिभेने साकरलेली व्यक्तिचित्रे सुद्धा मोठ्या संख्येने प्रसिद्व आहेत.या व्यक्तिचित्रांपैकीच एक म्हणजे सहज बोलता बोलता  शिव्या देणारे, प्रचंड तिखट खाणारे मात्र आतुन अत्यंत प्रेमळ स्वाभाव असणारे बेळगावचे रहिवासी रावसाहेब. बेळगाव,  आपल्या मराठी भाषिकांची अस्मिता, जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजे बेळगाव.तर या बेळगावला मी नुकतीच माझ्या 'एक दिवशीय भ्रमंती' या उपक्रमाद्वारे भेट दिली. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे सार मंडण्यासाठी प्रस्तूत लेखन तर वाचक मित्र मैत्रींणोंनो, माझ्रा एकदिवशीय भ्रमंतीची सुरवात नेहमीप्रमाणे झाली ती रात्री अकरा वाजता, पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या शिर्डी -बेळगाव नॉन एसी स्लिपर बसने. या बसने प्रवास करत पावणे सहाच्या सुमारास मी बेळगावच्या बसस्टँडवर पोहोचलो.बेळगावचे बसस्टँड मोठे असून या ठिकाणी ३७ प्लॅटफॉर्म आहेत.मी गेलो त्यावेळी नुकतेच उजाडत होते.माझ्या आतापर्यंत अनुभवानुसार परक्य...