सुरुवात एका नव्या पर्वाची थेऊरच्या अष्टविनायकाच्या दर्शनाने
मी जे फिरतो, त्याविषयी माझ्या मित्र परिवारात जेव्हा चर्चा होते त्यावेळी एक मुद्दा अनेकदा चर्चेस येतो ,तो म्हणजे मी एसटी बसने का फिरतो? .स्वतःच्या टू व्हीलरवर का फिरत नाही ? .माझे काही मित्र मला अनेकदा सांगत असतात. अजिंक्य आम्ही तुझ्या बरोबर फिरायला येऊ पण ती एसटी बस नको रे ! ठीक ठिकाणी थांबत जाण्यापेक्षा आपल्या टू व्हीलरने गेले कि मस्त सारखे थांबायला नको .एकदा निघालो कि थेट सुसाट.बरे मध्ये थांबावेसे वाटले कि थांबायचे ते देखील हवा तेव्हढा वेळ . निघायची घाई नाही आपल्याला हवा तसा प्रॉग्रॅम आखता येतोस्वतःच्या गाडीमुळे. चल निघायचे का ? मात्र अनेक कारणांनी मी एसटी बसने फिरण्याचे काही सोडत नव्हतो. टू व्हीलरने काही फिरायला जात नव्हतो. मात्र कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्रासदायक वाटते .एकदा केल्यावर त्यातील भीती मोठ्या प्रमाणात पळून जाते असे म्हंटले जाते. याचाच प्रत्यय मला नुकताच आला स्वःता टू व्हीलर चालवत मी नुकतेच पर्यंटन पूर्ण केले.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपल्याकडे देव दर्शनाने करण्याची आपल्याकडे पद्धत आहे माझ्या या नव्या पर्वाची सुरुवात देखील देवदर्शनाने झाली कोणत्याही आरतीच्या पहिल्यांदा ज्या देवतेची आरती केली जाते त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने मी स्वतः टू व्हीलर चालवत पर्यटन करण्यास सुरुवात केली पाहिल्यांदा करण्याची गोष्ट कमी करायची असते हे लक्षात घेऊन पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या अष्टविनायकाच्या दर्शनाने ही सुरुवात झाली
माझ्या या नव्या पर्वाची सुरुवात देखील मजेशीर झाली.रूममेट्स सुमंत शिंदे अष्टविनायका तुझ्या महिमा का ?या गाण्याचा चालीशी जुळणारे गाणे गुणगुणत होते. सुमंत यांची अनेक दिवसपासूनची फिरण्याची इछा होती.त्यातच ते गुणगुणणारे गाणे यामुळे मी त्यांना विचारले थेऊर चे गणपती मंदिर जवळच आहे जायचे का ? त्यांनी होकार दिल्याने आम्ही रूमपासून थेऊरच्या गणपती मंदिरापर्यंत टू व्हीलरवर प्रवास केला सुरुवातीपासुन शेवटपर्यंत मीच गाडी चालवली आणि माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. आता मी वेळोवेळी स्वतःच्या टुव्हीलरने प्रवास करेल मात्र ते एसटीइतके नियमित नसेल मात्र होणार हे नक्की त्यावेळचे अनुभव मी वेळोवेळी आपणास सांगेलच तूर्तास इतकेच


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा