पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुणे शहराचे विविधांगी सांस्कृतिक दर्शन घडवणारा भाग 'सिंहगडरोड'

इमेज
मी पहिल्यांदा शिक्षणासाठी आणि नंतर नोकरी निमित्ताने पुणे शहरात आलो. त्याला आता ४ते५ वर्षांहुन जास्त दिवस होऊन गेले आहेत.मात्र रोजच्या आयुष्यात बिझी असल्याने म्हणा किंवा अन्य काही अडचणींमुळे म्हणा पुणे शहराचा एक अत्यंत मर्यादित भाग असलेल्या टिळक रोड, सदाशिव पेठ पलीकडे फारसे पुणे शहर फिरलो नव्हतो.नाही म्हणायला काही न्युजपेपरमध्ये पुणे शहरातील विविध उपनगरांचा पेठांतील गमतीजमंती मात्र आवर्जुन वाचायचो. मात्र जसे काठावर उभे राहुन पोहणे शिकण्यात मज्जा नाही.तसेच फक्त याविषयी वाचून काही अर्थ नाही,या गोष्टी स्वत: अनुभवायला हव्यात,हेही समजत होते. त्यावेळी कधीना कधि या गोष्टी स्वत:अनुभवयाचा हे मी ठरवले होते.मात्र त्यावेळी काही कारणाने ते शक्य झाले नाही.आता पुणे शहरात बराच काळ काढल्यावर नोकरीत बऱ्यापैकी स्थैर्य आल्यावर मी ठरवून वेळ काढत पुणे शहरातील विविध भागांना भेट देत असल्याचे तूम्हाला माहिती झाले असेलचं तर याच मालिकेत मी नुकतीच सिंहगड रोड परिसराला भेट दिली त्यासाठी नेहमीप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पी.एम.पी.एम.एल.)चा एक दिवसाचा पास काढला.सकाळी लवकरच मी स्वारगेटहुन सुरूवात केल...

पुणे शहराची बहुसांस्कृतिक विविधता ही ओळख निर्माण करत स्वत्व न विसरलेला परिसर, 'औंध,बाणेर,पाषाण'

इमेज
गेल्याच रविवारची गोष्ट आहे. लहान मुले-मुली, युवा वर्गातील सळसळत्या शक्तीला विधायक स्वरुप देऊन २०४७मधील शक्तीशाली, बलशाली खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता असलेला अमृत भारत उदयास यावा,म्हणून तन मन झोकुन कार्य करणाऱ्या 'विवेकानंद केंद्र' या संस्थेच्या पाषाण येथे झालेल्या एका संस्कार वर्गाला भेट देण्याची संधी मिळाली.कार्यक्रम उत्तमच झाला.या कार्यक्रमा दरम्यान मला एका गोष्टीची जाणिव झाली, ती म्हणजे अरे आपल्या पुणे शहर जाणून घेण्याचा उपक्रमात पुणे शहराच्या काहीस्या एका कोपऱ्यात असलेल्या या भागाला जाणून घेणे राहिलेच की, मग काय कार्यक्रम संपल्यावर लागलो मी नेहमीच्या कार्यक्रमाला, अर्थात पुणे शहर भ्रमंतीला. कार्यक्रम पाषाण टेकडी परिसरात असल्याने अर्थातच सुरुवात त्या ठिकाणापासून झाली. पाषाण टेकडी आणि पाषाण तलावाच्या आसपासचा निसर्ग, शांतता आणि हिरवाई यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर असल्याचा अनुभव आला. थंड वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांचे किलबिलाट मनाला प्रसन्न करणारा होता. पुणे शहराची भौगोलिक रचना बशीप्रमाणे असल्याचे न्युजपेपरमध्ये वाचले होते,ते प्रत्यक्ष दिसले पाषाण टेकडी,चतूश्रूं...