पोस्ट्स

धार्मिक पर्यटन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गणपती उत्सवाच्या निमित्ताने खास

इमेज
वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो तुम्ही दहीहंडी उत्सवाच्या आंनद घेत असताना हा लेख वाचत असल्याची दाट शक्यता आहे कृष्ण भक्तीत रममाण झाल्यावर साधारणतः १२ दिवसांनी (जन्माष्टमी नंतर ८ दिवसानी पोळा आणि त्यानंतर ४ दिवसानी गणेश चतुर्थी या हिशेबाने) आपण बुद्धीची देवता गणरायाचे आगमन तितक्याच भक्ती भक्तिभावाने करू. (सध्याचा वादंग त्यावेळी मोठ्या प्रमाणात शांत झाला असेल) याची मला तरी खात्री आहे. या गणेशोत्वाच्या काळात आपण गणपतीच्या विविध मंदिरात त्याची मोठ्या श्रद्धेने पूजा करत असू. ही पूजा आपणास जास्तीत आनंदायी ठरो यासाठी गणपतीच्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या साडेतीन स्थानची माहिती देण्यासाठी सदर लेखन. या सर्व ठिकाणी मी वेगवेगळ्या वेळी भेटी दिल्या आहेत सर्व ठिकाणी माझा अनुभव मन प्रसन्न करणारा होता. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या सुखकर्ता विघ्नहर्ता रूपाचे दर्शन मला सर्व ठिकाणी झाले. गणपती केवळ बुद्धीची देवता नाही तर प्रसंगी दात तूटला तरी चालेल भक्तांना त्रास देणाऱ्या असुरांचा संहार करणारी देवता देखील आहे या एकदंत गजाननाचे दर्शन मला सर्वच ठिकाणी झाले मला हे माहिती आहे कि अनेक वाचकांचा गणपतीची साडेतीन ...

सुरुवात एका नव्या पर्वाची थेऊरच्या अष्टविनायकाच्या दर्शनाने

इमेज
  मी जे फिरतो, त्याविषयी माझ्या मित्र परिवारात  जेव्हा चर्चा होते त्यावेळी  एक मुद्दा अनेकदा चर्चेस  येतो ,तो म्हणजे मी एसटी बसने का फिरतो? .स्वतःच्या  टू व्हीलरवर  का फिरत नाही ?  .माझे काही मित्र मला अनेकदा सांगत असतात. अजिंक्य आम्ही तुझ्या बरोबर फिरायला येऊ पण ती एसटी बस नको रे ! ठीक ठिकाणी थांबत जाण्यापेक्षा आपल्या टू व्हीलरने गेले कि मस्त सारखे थांबायला नको .एकदा निघालो कि थेट सुसाट.बरे मध्ये थांबावेसे वाटले कि थांबायचे ते देखील हवा तेव्हढा वेळ . निघायची घाई नाही आपल्याला हवा तसा प्रॉग्रॅम आखता येतोस्वतःच्या गाडीमुळे. चल निघायचे का ?  मात्र अनेक कारणांनी मी एसटी बसने फिरण्याचे काही सोडत नव्हतो. टू व्हीलरने काही फिरायला जात नव्हतो. मात्र कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्रासदायक वाटते .एकदा केल्यावर त्यातील भीती मोठ्या प्रमाणात पळून जाते असे म्हंटले जाते. याचाच प्रत्यय मला नुकताच आला स्वःता टू  व्हीलर चालवत मी नुकतेच पर्यंटन पूर्ण केले.   कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपल्याकडे देव दर्शनाने करण्याची आपल्याकडे पद्धत आहे माझ्या या नव...

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे

इमेज
  आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात पर्यटनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो.  लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने बाहेर काढण्यासाठी अध्यात्म, पुण्याचे संकलन आदी संकल्पनाच्या आधार घेत विविध धार्मिकस्थळे निर्माण केलेली आहेत. .त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडगाव कांशबिंगे हे साडेतीन गणपतीपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थान होय. या स्थानाला मी नुकतीच भेट दिली.मनाला नवी ऊर्जा देणारा अनुभव होता तो  हो,, !  गणपतींची सुद्धा साडेतीन स्थाने आहेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांना मी काहीतरी चुकीचे सांगतोय साडेतीन स्थाने तर देवीची आहेत गणपतीची नाहीत असे वाटू शकतो . माझा अष्टविनायक आणि देवीची साडेतीन शक्तिपीठे यामध्ये गल्लत झाली तर नाहीना असे वाटू शकते .तर त्यांना माझे सांगणे आहे की हो गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत. गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे.गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध  केल्याने त्या राक्षसाच्या इच्छेनुसार गणपतीला मयुरेश्वर हे नाव मिळाले तर या मयुरेश्वर या नावाच्...

रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'

इमेज
 रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन                   तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन, पर्यटन करत असे  मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती.  मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०...