पोस्ट्स

सर्व साधारण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ११(पर्यटन म्हणजे नक्की काय )

इमेज
मी, सध्या माझ्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मी ज्या शहरात राहतोय, त्या पुणे शहरातील विविध भागांना भेटी देतोय, हे एव्हाना आपणास माहिती असेलच. त्याच संदर्भात माझ्या एका मित्राशी बोलताना, हे काय पर्यटन म्हणायचे? पर्यटन म्हणजे दुसऱ्या देशात फिरायला जाणे. ते जमले नाही तर दुसऱ्या राज्यात जाणे.तेही जमेल नाही तर भलेही आपल्याच राज्यात असे ना, दुसऱ्या शहरात जाणे होय.आपण ज्या शहरात राहतो.त्याच शहराच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देणे म्हणजे पर्यटन म्हणायचे का ?  हा मुद्दा निघाला.मुद्दा निघाला खरा मात्र काही कारणाने त्यावर चर्चा काही आमच्यात रंगू शकली नाही.जरी आमच्यात चर्चा रंगू शकली नसली तरी माझ्या मनात विचारचक्र मात्र सुरू झाले.तेच तूमच्यापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन. तर प्रत्येक शहराचे नव्हे तर शहरातील प्रत्येक भागाचे एक स्वतंत्र्य वैशिष्ठ असते. आपण ज्या शहरात राहतो.त्या शहराचे सर्वसाधरण वैशिष्ठ  आपणास माहिती असते.मात्र आपल्या शहरातीलच मात्र आपण फारसे न गेलेल्या भागाचे वैशिष्ट आपणास माहिती असेलच असे नाही‌.उदाहरणार्थ आपण पुणे शहरातील गणेश पेठ, रविवार पेठ याला एक भ...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १०(मला प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि समस्या )

इमेज
           मी एसटी बसचा वापर करतो,हे एव्हाना आपणास माहिती असेलच.एसटीच्या उपलब्धतेनुसार माझ्या पुर्वनियोजित कार्यक्रमात बदल देखील होतो हेही आपणास माहिती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.काही अत्यंत तूरळक घटनांचा अपवाद वगळता हे बदल खुपच किरकोळ स्वरूपाचे असतात.काही अत्यंत अपवादत्मक घटनेत मात्र हे बदल पुर्णत:180अंशात माझी भटकंती 100 टक्के बदलणारे असतात. असाच एक फिरणे 100 टक्के बदलण्याचा अनुभव मला गेवराईच्या फिरण्याचा दरम्यान आला.माझे आजचे लेखन तो अनुभव आपणापर्यत पोहोचवण्यासाठी          तर मित्रांनो, पुणे शहरातून गेवराईला जाण्यासाठी मी पुणे ते आहिल्यानगर आणि तेथून पुढे अहिल्यानगर ते गेवराई असे नियोजन केले होते. मी नगरला जाण्यासाठी निवडलेली बस कर्नाटक ची असल्याने ती माळीवाडा किंवा स्वस्तिक बसस्टँडला न येता तारकपूर बसस्टँडवरुनच पुढे शिर्डीला जणार होती.त्यानुसार मी तारकपूर बसस्टँडला सकाळी साडेसहा वाजता आल्याने चौकशी खिडकी बंद होती.त्यामुळे तेथील एका कंडक्टरला गेवराई बसेस कोठून सुटतात असे विचारल्यावर  त्यांनी माळीवाडा असे उत्तर दिल्या...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ९ (माझे आवडते पर्यटनस्थळ )

इमेज
मला अनेकजण विचारतात . अजिंक्य,  तू इतके फिरतो, त्यातील तुझे सर्वात आवडते पर्यंटन स्थळ कोणते ? माझे आजचे लेखन या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. तर मित्रांनो माझ्या आवडीची अनेक स्थळे आहेत.काही स्थळे मला तिथे जाण्याची आणि राहण्याची  सोय फार उत्तम असल्याने आवडली आहेत. काही स्थळे तेथील निसर्ग सौदर्यांमुळे आवडली आहेत. तर काही तिथे गेल्यामुळे मिळणाऱ्या शांततेमुळे आवडली आहेत. तरी या सर्वांचा एकत्रित विचार करता मला आवडलेले सर्वात उत्तम स्थळ आहे . गुजरातच्या डांग जिल्हयात असणारे सुब्बीर या तालुक्या मुख्यालयाच्या जवळ असणारे शबरीधाम - पम्पा सरोवर  हे ठिकाण .या ठिकाणी मी गेल्या वर्षी 2025 ला एप्रिल 13 रोजी भेट दिली. नाशिकहून गेल्यास एका दिवसात सहज फिरून होण्यासारखे हे ठिकाण आहे .ज्यांना नाशिकहून १५० किमीच्या च्या परिसरातील स्थळे बघायची आहेत जी फारशी परिचित नाहीत त्याच्यासाठी स्वर्ग म्हणून हे स्थळ बघता येईल,मंदिर अर्ध्या तासात सहज बघून होते तसचे तलाव देखील एका तासात सहज बघून होतो त्यामुळे जायला  येयला प्रत्येकी २ तास स्थलदर्शनाला एक ते दीड तास आणि अन्य एक तास सात ते आठ तासात आपले हे ...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८

इमेज
मी माझ्या फिरण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर करतो जर एसटी बसचा वापर शक्य नसेल तर मी खासगी बस वाहतूकदारांचा वापर करतो . अन्य खासगी वाहतूक साधनांचा वापर मी जवळपास शून्यच्या बरोबरीने वापर करतो. हे माझ्या प्रवासाबाबतच पुरेशी माहिती असणाऱ्या अनेकांना एव्हाना चांगलेच माहिती झाले असेल. जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीला मी एसटी बसचा चाहता आहे हे समजते त्यावेळी  काही वेळा  काय हे एसटी आवडू कशी शकते ? एसटी बस पेक्षा इतर प्रायव्हेट ऑपरेटर खूप ऊत्तम सेवा देतात. त्यांचा वापर करायला  काय जाते. पॆसे जवळपास सारखेच लागतात. या प्रतिक्रयेला मला सामोरे जावे लागते . काही जणांचा रोख सार्वजनिक बसवाहतुकी पेक्षा स्वतःचे वाहन काढून फिरण्यास प्राधान्य देण्यास असतो त्यांच्यामते कुठे बसची वाट बघायची बस ठीक ठिकाणी थांबत जाणार त्यात विनाकारण वेळ वाया जाणार तसेच बसमधील सहप्रवासी कसा असेल तो विक्षिप्त असेल तर काय सर्व प्रवाशाची मजाच जाणार . त्या पेक्षा स्वतःचे वाहन काढायचे हवे त्या ठिकाणी थांबायचे ते देखील हवे तेव्हडा वेळ .पूर्णतः स्वतःच्या मानाने फिरायचे   हे दोन्ही दृष्टिकोन त्यांच्या त्...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक 7

इमेज
हा मजकूर वाचताना तूमच्यापैकी अनेकांच्या मनात माझ्याविषयी एकच ओळख ठळकपणे पुढे आली असेल ती म्हणजे मी प्रामुख्याने एसटी बसच्या माध्यमातून केलेल्या माझ्या सोलो ट्रिप्स. आजपर्यंत पूर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता, जिथे जिथे आपली एसटी पोहोचते, त्या महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात मी अनेकदा भटकंती केली आहे. या प्रवासात नुसती ठिकाणेच नाही, तर माणसे, संस्कृती, अनुभव आणि आठवणी यांचाही साठा जमा झाला. या प्रवासादरम्यान मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातील काही अनुभव मी यापूर्वी तुमच्याशी शेअर केले आहेतच. मात्र अजूनही काही अनुभव असे आहेत, जे आतापर्यंत सांगायचे राहून गेले होते.तेच न सांगितलेले, वेगळे आणि लक्षात राहिलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे हे लेखन मी फिरायला जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यापैकी काही ठिकाणी एसटीची एक पेक्षा जास्त बसस्टँड असतात.त्यामुळे  बसचे व्यवस्थापन करायला एसटी प्रशासन करायला सोपे जाते तसेच  माझ्या सारख्या फिरणाऱ्या व्यक्तीला हे विविध प्रकारचे अनुभव देणारे ठरते. गावात आल्यावर जर पूढे जायचे अस...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

इमेज
          मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.                    तर मित्रांनो, मी माझ्या पर्यटनाच्या तयारीची सुरवात संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून त्या त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेवून करतो ,हे आपणास आता ज्ञात झाले असेलच.त्यानुसार माहिती घेत मी सांगली जिल्हा स्थळदर्शनासाठी निघालो असताना नाट्यमय प्रसंग घडला. त्यांचे झाले असे की,   नरसोबाची वाडी हे देवस्थान सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी, प्रशासकीयदृष्ट्या ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर त्याची माहिती नव्हती, आणि मी...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५

इमेज
                    मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.                  तर मित्रांनो,मी पुण्याहुन सातारा शहरात  जाण्याच्यवेळी एक छोटीसी गंमत माझ्यासवेत झाली.मी पुण्याहुन सातारा शहरात जाण्याच्यवेळी रेल्वेने जावू आणि तेथून परत येताना बसने येवू असे नियोजन केले होते.त्या नियोजनानुसार मी रेल्वेने सातारा शहरात दाखल झालो सातारा शहर हे गावाबाहेर आहे आणि तेथून शहारत येण्याच्या सोयीसुविधा त्यावेळी तरी खूपच तुरळक होत्या आता परिस्थिती कदाचित सुधारली असेल तर मी रेल्वेस्टेशनवर उतरलो.  उतरल्यावर मी प्रसाधनगृहात जावूंन मी ताजवतावाना झालो आणि रेल्वे गेल्यावर सुमारे चार ते प...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग४

इमेज
        मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले. तेदेखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि   भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच. ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर   व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच. या लेखात माझ्या फिरण्यात ज्या बाबी मला दिसून आल्या त्याविषयी मी बोलणार आहे.     तर मित्रांनो, मी माझ्या फिरण्याची तयारी करताना संबधित जिह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जावून संबंधित जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेत माझ्या फिरण्याचे नियोजन करतो.या दरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे, पालघर जिल्ह्याचा अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याचा वेबसाइट नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडून संचलित करण्यात आलेल्या असल्यातरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल...

पर्यटनाच्या निमित्ताने (भाग३)

इमेज
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात . आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा ( नागपूर प्रशासकीय विभाग ) अपवाद वगळता आपली एसटी जाते अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे . या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले . ते देखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि   भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच . ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर   व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच .    तर माझ्या या प्रवास करण्याची सुरुवात एका अपघाताने झाली . अपघाताने म्हणजे रस्ते , रेल्वेवरील अपघात नव्हे तर माझ्या आयुष्यात अकस्मात घडलेल्या एका घटनेने . जर ती घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर मी जास्त फिरलोच नसतो असे म्हणा हवतर   कारण त्या अपघात अकस्मात घडणाऱ्या घटनेच्या आगोदर मी स्वतः एकट्याने फिरायला गेल्याचे आपणास फारसे आढळणार नाही   तर मी माझे पत्रकारितेचे शिक्षण स...