पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक 7
हा मजकूर वाचताना तूमच्यापैकी अनेकांच्या मनात माझ्याविषयी एकच ओळख ठळकपणे पुढे आली असेल ती म्हणजे मी प्रामुख्याने एसटी बसच्या माध्यमातून केलेल्या माझ्या सोलो ट्रिप्स. आजपर्यंत पूर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता, जिथे जिथे आपली एसटी पोहोचते, त्या महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात मी अनेकदा भटकंती केली आहे. या प्रवासात नुसती ठिकाणेच नाही, तर माणसे, संस्कृती, अनुभव आणि आठवणी यांचाही साठा जमा झाला.
या प्रवासादरम्यान मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातील काही अनुभव मी यापूर्वी तुमच्याशी शेअर केले आहेतच. मात्र अजूनही काही अनुभव असे आहेत, जे आतापर्यंत सांगायचे राहून गेले होते.तेच न सांगितलेले, वेगळे आणि लक्षात राहिलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे हे लेखन
मी फिरायला जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यापैकी काही ठिकाणी एसटीची एक पेक्षा जास्त बसस्टँड असतात.त्यामुळे बसचे व्यवस्थापन करायला एसटी प्रशासन करायला सोपे जाते तसेच माझ्या सारख्या फिरणाऱ्या व्यक्तीला हे विविध प्रकारचे अनुभव देणारे ठरते. गावात आल्यावर जर पूढे जायचे असल्यास कोणत्या बसस्टँडवर जायचे? ते किती लांब आहे, रिक्षाने जायचे ठरवल्यास किती भाडे लागेल.याबाबतची माहिती मिळताना व्यक्तींच्या विविध स्वाभावांचे दर्शन होते.
बसस्टँड विविध प्रकारची असतात.काही बसस्टँड छोटी असतात.काही मोठी असतात. त्यामुळे विविध गोष्टी अनुभवास येतात.एकदा मी पुणे शहरातून डोबिंवली शहरात एसटी बसने गेलो.पनवेलनंतर शहर बसवाहतुकीची बस असावी या प्रकारचे थांबे बस घेऊ लागली.माझी जागा खिडकीपासी असल्याने मला दिसत होते की अमुक ग्रामपंचायत स्वागत करत आहे,तमुक ग्रामपंचायत स्वागत आहे. या प्रकारचे बोर्ड असलेल्या ठिकाणी बस त्या त्या गावासाठी थांबत होती सरतेशेवटी बस डोंबिवलीमध्ये आली.बस कंडक्टरने डोंबिवली आले असे सांगितल्याने मी उतरलो .डोंबिवली शहर असल्याने मी जो विचार बसस्टँडचे म्हणून केला होता त्याचा पूर्णपणे विरोधी चित्र होते.एखादा बसस्टॉप असावा असे चित्र होते.त्यावर एका छोट्याशा काळ्या रंगाच्या बोर्डवर डोंबिवली बसस्थानक असे लिहले होते.बस भर दुपारी एक वाजता येऊन सुद्धा बसस्टँडवर आमची एकच बस होती. बसस्टँडवर आमच्या बसमधून उतरलेल्या प्रवाशाखेरीज कोणीही नव्हते.डोंबिवलीचे बसस्टँड हे शहराचे नव्हे तर जिल्ह्याच्या नकाशातच स्थान मिळेल अश्या अमुक ब्रुद्रुक तमुक खुद्र या प्रकारच्या गावातील बसस्टँडचे वाटावे असे होते. अर्थात डोंबिवली शहर हे लोकलच्या काट्यावर चालणारे असल्याने एसटी बसच्या बाबत कमी असेल कदाचित
बारामतीला फिरण्यासाठी गेलो असता पोलिस स्टेशनमध्ये जावे लागले.त्याचे असे झाले की,बारामती रेल्वेस्टेशन शेवटचे रेल्वे स्टेशन आहे.बारामतीच्या पुढे रेल्वे जात नाही.तो रेल्वेचा शेवट बघण्याची इच्छा होती.म्हणून मी रेल्वेस्टेशनवर जाऊन तेथील चहावाल्यास दौड कोणत्या बाजूला आहे, विचारले. आणि दुसऱ्या बाजूला चालायला सुरवात केली.मी रेल्वे रुळाचा शेजारून शेवट बघण्यासाठी जात असताना आर.पी.एफ चा जवानाने मला हटकले.आणिहमला त्याचा केबिनमध्ये नेले.मी निरुपद्रवी आहे, हे लक्षात आल्यावर पाच ते दहा मिनीटे बसवून सोडून दिले.
तर मित्रांनो, माझ्यासारखे अनुभव घ्यायचे असतील तर तुम्हीही नक्की फिरायला निघा—अशीच एक मनापासूनची सुचना आहे. मी स्वतः एसटीचा वापर करून भटकतो, पण तुम्हीही तसंच करायलाच हवं, असा माझा अजिबात आग्रह नाही.
तुम्हाला जे साधन सोयीचं वाटेल, ज्या मार्गाने मन आनंदी होईल, त्या मार्गाने प्रवास करा. साधन महत्त्वाचं नाही, प्रवास महत्त्वाचा आहे. कारण फिरल्याशिवाय अनुभव मिळत नाहीत, आणि अनुभवांशिवाय आयुष्य अपुरं वाटतं.
मग काय मित्रांनो… मग कधी निघणार फिरायला
पर्यटनाच्या निमित्ताने याचा ६ वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/6.html
पर्यटनाच्या निमित्ताने याचा ५ वा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post_16.html
पर्यटनाच्या निमित्ताने याचा ४ था भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post.html
पर्यटनाच्या निमित्ताने याचा ३ रा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2023/11/blog-post.html
पर्यटनाच्या निमित्ताने याचा २ रा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2022/11/blog-post_26.html
पर्यटनाच्या निमित्ताने याचा १ला भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2020/02/blog-post.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा