साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे
आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात पर्यटनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो. लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने बाहेर काढण्यासाठी अध्यात्म, पुण्याचे संकलन आदी संकल्पनाच्या आधार घेत विविध धार्मिकस्थळे निर्माण केलेली आहेत. .त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडगाव कांशबिंगे हे साडेतीन गणपतीपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थान होय. या स्थानाला मी नुकतीच भेट दिली.मनाला नवी ऊर्जा देणारा अनुभव होता तो
हो,, ! गणपतींची सुद्धा साडेतीन स्थाने आहेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांना मी काहीतरी चुकीचे सांगतोय साडेतीन स्थाने तर देवीची आहेत गणपतीची नाहीत असे वाटू शकतो . माझा अष्टविनायक आणि देवीची साडेतीन शक्तिपीठे यामध्ये गल्लत झाली तर नाहीना असे वाटू शकते .तर त्यांना माझे सांगणे आहे की हो गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत. गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे.गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध केल्याने त्या राक्षसाच्या इच्छेनुसार गणपतीला मयुरेश्वर हे नाव मिळाले तर या मयुरेश्वर या नावाच्या राक्षसाचा वध करताना राक्षसाचे शरीर ४ ठिकाणी पडले .आज ही स्थाने साडेतीन गणपती म्हणून ओळखली जातात.
ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहराजवळ असलेले पद्मालय, जालना जिल्ह्यात असलेले राजूर तर पुणे जिल्ह्यातील वडगाव कांशबिंगे ही ३ पूर्ण पीठे समजली जातात आणि चिंचवड मोरया गणपती अर्धे पीठ समजले जाते .त्यातील वडगाव कांशबिंगे या साडेतीन गणपतींपकी एक असलेल्या पूर्ण पीठाला मी नुकतीच भेट दिली.
आपल्या महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अष्टविनाययक या नावाने गणपतीची आठ स्थाने प्रसिद्ध आहेत. पुणे शहर हे केंद्र मानून सुमारे १०० ते १२५ किमीचे वर्तुळ नकाश्यावर काढल्यास त्यामध्ये ही स्थाने येतात. या सारखाची नागपूर हे केंद्र मानल्यास देखील आठ गणपतीची स्थाने येतात ज्याला वैदर्भीय अष्टगणेश म्हणतात. यांचे दर्शन घेतल्यास मोठ्या प्रमाणात पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे . महाराष्ट्रात गणपतीच्या १६ स्थाने प्रसिद्ध आहेत मात्र त्याबरोबर या साडेतीन गणपतीचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे काम समजले जाते
तर मित्रानो काही कामानिमित्त पुणे शहरात गेलो होतो .माझे काम चार दिवस चालणार होते . मात्र त्यामध्ये एक दिवस रविवारचा आल्याने त्या दिवशी कामाला सुटी होती .या सुट्टीचा सदुपयोग करत मी वडगाव काशीबेंग येथे या साडेतीन गणपतींपैकी एक असलेल्या गणपती स्थानाला भेट दिली. आपण स्वतःचे वाहन असल्यास मंचर भीमाशंकर रस्त्यावर मंचर पासून ७ ते ८ किलोमीटर दूर असलेल्या स्थानाला सहज भेट देऊ शकतो. मंदिर छोट्याशा टेकडीवर आहे परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाचे मंदिर साधारणतः ज्या प्रकारच्या उंचीवर आहे त्याच्या सव्वापट उंचीच्या टेकडीवर हे मंदिर आहे मंदिराचा परिसर खूप शांत आहे
मंदिर विशेष प्रसिद्ध नसल्याने काही मोजके दिवस वगळता विशेष गर्दी नसते . मंचरहून सकाळी साडेआठ आणि दूपारी साडेतीन वाजता थेट मंदिरच्या संरक्षण भिंतीपर्यंत बस सेवा आहे जर या बसेस न मिळाल्यास भीमाशंकर ला जाणाऱ्या कोणत्याही बसेसहूनआपण वडगाव कांशबिंगेच्या फाट्यावर येऊ शकतो तेथून अडीच किलोमीटरवर मंदिर आहे
इतर साडेतीन गणपतीच्या ठिकाणी निवासाची सोय आहे. मात्र या स्थानी निवासाची सोय नाहीये त्यामुळे दर्शन घेऊन पुण्याला येणे आवश्यक आहे. साडेतीन गणपती पैकी एक असलेल्या राजूर गणपती एव्हढीच खाण्याची सोय आहे. सबब मंचरला खाऊनच या गणपतीचे दर्शन घेणे आवश्यक आहे.
मी साडेतीन गणपतींपैकी या गणपतीचे दर्शन घेतल्याने माझे सर्व साडेतीन गणपतीचे दर्शन पूर्ण झाले आहे. अष्टविनायक देखील कधीचेच पूर्ण झाले आहे मात्र वैदर्भीय अष्टगणेशाचे दर्शन बाकी आहे देवाच्या मनात असेल तर ते देखील पूर्ण होईलच असा विश्वास आहे माझे ते दर्शन जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी मी त्याविषयी सांगेलच तूर्तास इतकेच
गणपती बापा मोरया .मंगलमूर्ती मोरया

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा