पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५

                 

  मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.
                 तर मित्रांनो,मी पुण्याहुन सातारा शहरात  जाण्याच्यवेळी एक छोटीसी गंमत माझ्यासवेत झाली.मी पुण्याहुन सातारा शहरात जाण्याच्यवेळी रेल्वेने जावू आणि तेथून परत येताना बसने येवू असे नियोजन केले होते.त्या नियोजनानुसार मी रेल्वेने सातारा शहरात दाखल झालो सातारा शहर हे गावाबाहेर आहे आणि तेथून शहारत येण्याच्या सोयीसुविधा त्यावेळी तरी खूपच तुरळक होत्या आता परिस्थिती कदाचित सुधारली असेल तर मी रेल्वेस्टेशनवर उतरलो.  उतरल्यावर मी प्रसाधनगृहात जावूंन मी ताजवतावाना झालो आणि रेल्वे गेल्यावर सुमारे चार ते पाच मिनिटांनी बाहेर आलो आणि बघतो तर काय बाहेर चिटपारखू देखील नव्हते शेवटी रेल्वे स्थेशांवर परत आल्यावर चौकशी केल्यावर समजले की स्टेशन गावाबाहेर असल्याने आणि स्टेशनवर फारशी वर्दळ असल्याने येथे गाडीच्या वेळेस फक्त दोन ते चार रिक्षा असतात त्या गेल्यास किमान अडीच किलोमीटर जाऊन पुणे सातारा 
रस्त्यावर येऊन वाहने पकडणे आवश्यक आहे जर तिथे गाडी न मिळाल्यास सहा किलोमीटर चालत जावूंन शहरात   जाण्याशिवाय पर्याय नाही या सूचनेनुसार मी पुणे सातारा रस्त्यावर चालणे सुरु केले माझ्या सुदैवाने मी एक ते दीड किलोमीटर गेल्यावर मला एक प्रवाशी जीप दिसल्याने माझा प्रवास खूपच सोईस्कर झाला 
             मला अशाच एका चांगला अनुभव मी जालना जिल्ह्यतील समर्थ रामदास स्वामी  यांचे जन्मस्थळ असलेल्या जाम समर्थ या ठिकाणी जाताना आला .  या स्थळावर जाण्यसासाठी मी त्या ठिकापासून नऊ किलोमीटर दूर असणाऱ्या कुंभारी पिंपळगाव या गावात आलो त्यापुढे जाण्यसासाठी मला बस मिळेना प्रवाशी जीप वाहतूकदार या नऊ किलोमीटरसाठी २५० ते २७५ रुपये मागू लागले मी तेव्हढे देण्यासाठी अर्थातच तयार नव्हतो आता काय करायचे ? पुढील नऊ किलोमीटर पायी चालायचे का ? की इतक्या दूर आडवळणाच्या गावात येऊन सुद्धा आपल्या नशिबी समर्थ रामदास स्वामी यांच्या जमस्थळाचे दर्शन घेण्याच्या योग्य नाही असे मानून शांत राहायचे ? या विचारत मी एका चहाच्या टपरीवर गेलो आणि मला साक्षात देवदूतच भेटला असे म्हटल्यास वावगे ठरू नये गावात कोणीतरी नवीन आलेला दिसतॊय हे बघून त्याने माझी समस्या समजवून सांगितली आणि त्यावर तोगडा देखील सांगितलं या तोडग्यामुळॆ मी जिथे मला किमान २५० रुपये लागणार होते तिथे माझे काम अवघ्या २० रुपयात झाले  
                 मी पुण्यात नोकरी करत  असताना ,जवळपासच्या देवस्थानाला भेटी देण्यास सुरवात केली या दरम्यान मी पुण्यापासून सुमारे २०० किलोमीटर वरील एका प्रसिद्ध देवस्थानाला भेट दिली असता (मी जाणीवपूर्वक उल्लेख टाळतोय ) एक पुणेरी पाटील देखील वरचढ ठरेल अशी पाटी  त्या देवस्थनांच्या प्रसादयाला बघितली ती होती हे  प्रसादय फक्त स्थानिकेत्तर भाविकांसाठी आहे या ठिकाणी स्थानिक ******* करानी जेवू नये जर स्थानिक

********* कर जेवताना सापडले तर अपमान करत बाहेर काढले जाईल आता भाविकांना पुरेशा  प्रसाद मिळावा त्यांना कमी पडू नये हा हेतून कितीही उद्दात असला तरी अशी पाटी योग्य नाही असे मला वाटते   त्या नंतर मी अन्य अनेक देवस्थनांना भेटी दिल्या  सुदैवानी मला अशी पाटी अन्य देवस्थानांमध्ये  आतापर्यंत तरी मला आढळलेली नाही  
          मी फिरण्याच्या उद्देश्याने रत्नागिरीला गेलो असताना देखील  एक बाका  प्रसंग माझ्यावर आला होतो. ते २०१७ साल होते.  माझ्या एका पुण्याच्या परिचितांच्या ओळखीने मी रत्नागिरी परिसर फिरायला एक रिक्षा केली होती त्या रिक्षावाल्याने मला रत्नागिरी शहर आणि परिसर खूप ऊत्तम रीतीने फिरवला स्थलदर्शनाच्या अखेरीस जेव्हा पैसे देण्याच्यी वेळ आलीत्यांच्याकडे ऑनलाईन पसे घेण्याची काहीच सोय नव्हती माझ्याकडे पुढच्या प्रवाश्याचा विचार करता पुरेसे नगद पैसे नसल्याने,  त्यांना पैसे देण्यासाठी मी त्यांना रिक्षा ATM पाशी नेण्यास सांगितले,  आणि एका नाट्याला सुरवात झाली रत्नागिरी शहराच्या बाजारपेठेत आम्हाला ATMच दिसेना . अखेर काही ATM दिसले मात्र त्या ठिकाणी ATM मध्ये पैसेच नव्हते त्यामुळे माझा आणि त्या रिक्षावाल्याचा पैसे असलेल्या ATM  चा शोध सुरु झाला अखेर आम्हाला पॆसे असलेलं  ATM सापडले आणि मी आणि रिक्षावाल्याने सुटकेचा निश्वास सोडला रत्नागिरी हे नगरपरिषद असलेले जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेयला हवे ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्थेचे एक विदारक चित्र मी त्यावेळी अनुभवले 
        मी एसटीचा आवडेल तिथे प्रवास आणि सध्या बंद असलेल्या २०० रुपयाचा पास घ्या आणि वर्षभर एसटीच्या प्रवाश्यात १० % सूट घ्या या योजनेचा फायदा घेत विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभाग वगळता संपूर्ण महाराष्ट्र
आणि गोवा गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यात फिरलो आहे त्यावेळी मला अनेक अनुभव आलेले आहेत ते मी वेळोवेळी आपणास सांगतच आहे ज्यांना याच्या आधीचे माझे लेख लेख वाचायचे आहेत त्यांनाते सहजतेने वाचता यावे यासाठी त्याचा लिंक मी पुढे  देत आहे त्यावर क्लिक करून आपण ते वाचू शकाल
 चवथ्या भागाची लिंक 


तिसऱ्या भागाची लिंक 

दुसऱ्या भागाची लिंक 


पहिल्या भागाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

मराठवाड्यातील एक दिवस