गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

 


 मी नुकतीच म्हणजे वार रविवार, 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा )या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली, ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी  शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी, सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला  जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या  दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150किमीवर असणाऱ्या बडोदा (गुजराती उच्चार वडोदरा ) या शहरासाठी गुजरात राज्य परिवहनाच्या एक्सप्रेस दर्जाच्या बसमधून प्रवाश्यास सुरवात केली . ज्यासाठी मला 119रुपये द्यावे लागले . गाड्याची
रचना आपल्या परिवर्तन बसेससारखी होती . मात्र त्याच्या वेग इतर गुजरात राज्य परिवहन महामंडळच्या बसेसपेक्षा जास्त असल्याचे त्या बसच्या कंडक्टरने मला सांगितले . अनेक लहान गावामध्ये  ही बस थांबल्याचे  मला जाणवले. एव्हढ्या अंतरासाठी अश्या प्रकारच्या सेवेसाठी  आपल्या  महाराष्ट्र एसटीमार्फत किती रुपये घेतले  जातातहे आपण जाणताच . तर अंकलेश्वर भरूच मार्गे मी गुजरात राज्यातील मराठी लोकांची प्रचंड संख्या असणाऱ्या बडोदामध्ये पोहोचलो . बडोदा  येथे दोन बसस्टँड आहेत . त्यापैकी मोठ्या असणाऱ्या बसस्टँडचे  व्यवस्थापन  खूप चांगले आहे . याठिकाणी बसेस येण्याच्या मार्गातून प्रवाश्याना जात येत नाही . प्रवाश्यांनी या ठिकाणहून आत मध्ये प्रवेश करू नये यासाठी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत . मी येताना आणि जाताना दोन्ही वेळ मिळून सुमारे पाऊण तास  मोठ्या बसस्टॅन्डमध्ये होतो  , या कालावधीत मला एकही खाजगी बस ऑपरेटर प्रवाशी  घेण्यासाठी बसस्टँडवर दिसला नाही . आपल्याकडील बसस्टँडवर काय चित्र असते , हे नव्याने सांगायची गरज नाही . बडोदयाला भल्या पहाटे पोहोचल्यामुळे , आणि प्रवाश्यात माझी पुरेशी झोप झाल्याने मी थोडावेळ बडोदा रेल्वेस्टेशनवर विश्रांती घेऊन बडोदा स्थल दर्शनाची सुरवात केली . बडोदा मोठ्या बसस्टॅन्डपासून बडोदा रेल्वेस्टेशन जवळ आहे . .

  बडोद्याला असणाऱ्या पर्यटन स्थळाच्या विचार करता "महाराजा फतेसिंग वस्तुसंग्रहलय " , सयाजीराव गायकवाड यांच्या राजवाडा अशी पर्यटनस्थळे आहेत . . माझ्याकडे अत्यंत कमी वेळ असल्याने मी फक्त महाराज फत्तेसिंग वस्तुसंग्रहालय  बघितले आणि स्थानिक बस मधून शहरात फेरफटका मारला .  रेल्वेस्टेशनपासून फत्तेसिंग वस्तुसंग्रहालय साठी स्पेशल रिक्षा केल्यास मीटरनुसार 50 रुपये होतात . या वस्तुसंग्रहालयापासून रेल्वेस्टेशनपर्यंत शेअर रिक्षा देखील उपलद्ध आहे जिचे भाडे 10रुपये आहे अशी माहिती नंतर मला स्थानिक लोकांकडून समजली . महाराजा फत्तेसिंग वस्तुसंग्रहालय सकाळी साडेनऊ पासून सायंकाळी पाच पर्यंत उघडे असते . वस्तुसांग्रहालय

साठी 150रुपये प्रवेशशुल्क आहे , तर गाईडची सुविधा हवी असल्यास अतिरिक्त 30 रुपये द्यावे लागतात . यातून जमा होणारा पैसा शैक्षणिक कार्यासाठी वापरला जातो . गाईडची सोय हिंदी अथवा इंग्रजी भाषेत होऊ शकते . सर्वसाधारणपणे वस्तुससग्रहालय दीड तासात आरामात बघून होते . वस्तुसंग्रहालयात विविध भाग असून पहिल्या भागात बडोदा संस्थानाच्या राज घरण्याविषयी माहिती देण्यात आली असून , अन्य विभागात सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी जमवलेल्या विविध कलाकृतीचे प्रदर्शन करण्यात आले आहे . वस्तुसांग्रहलय राजवाड्याच्या परिसरात गेट क्रमांक 6च्या जवळ असून , याच राजवाड्याच्या गेट क्रमांक 3हुन राजवाड्याच्या मुख्य इमारतीत प्रवेश करता येतो . मात्र राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी 250 रुपये द्यावे लागतात .

मी वस्तुसंग्रहालय बघत असताना  मला तिथे मराठी भाषिक कर्मचारी दिसले . त्यातील एकाशी बोलताना  त्याने बडोद्यामध्ये 60 % मराठी असल्याचे सांगितले . वस्तुसांग्रहालय बघितल्यावर माघारी येत असताना एक रिक्षावाल्याशी बोलताना बडोद्यामध्ये 20 %मराठी असल्याचे सांगि येतात तले .  मात्र एव्हड्या मोठ्या संख्येने असून देखील मला बडोदा शहारत अत्यंत तुरळक मराठी पाट्या दिसल्या . शहर बस वाहतुकीच्या बसेसवर सर्व गोष्टी गुजराती भाषेत लिहलेल्या होत्या . सुरतला ज्या प्रमाणे शहर बस वाहतुकीच्या बसेसवर काही प्रमाणात देवनागरी लिपीत मजकूर दिसतो त्या प्रकारे येथे औषधाला देखील मजकूर आढळत नाही . किंबहुना नाशिकमध्ये न्यूजपेपरच्या स्टॉलवर काही गुजराती दैनिके दिसतात .त्या प्रमाणे मराठी दैनिके  येथे आढळत नाही . मी शहरात फिरत  असताना अहमदाबाद येथून प्रकाशित होणारे राजस्थान पत्रिका हे दैनिक मला दिसले.  मात्र मराठी दैनिक  काही दिसले नाही  याबाबत मी तेथील एका न्यूजपेपर स्टॉल धारकाशी बोलल्यावर त्याने लोकसत्ता आदी काही मराठी दैनिके  एक दिवस उशिराने येथे . येतात मात्र ती कोणी फारशी घेत नाहीत .इथले मराठी भाषिक सुद्धा


गुजराती दैनिके वाचतात असे सांगितले . बडोद्याहून भरूच, अहमदाबाद , आंनद,  गोध्रा , दाहोद आदी ठिकाणी लोकलसेवा आहे . बडोद्याहून सुरतला येण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी रेल्वेसेवा आहे . (अंतर 130किमी ) दुपारी अनेक बसेस आहेत . वस्तुसंग्रहालय आणि शहर दर्शन केल्यावर मी अहमदाबाद ते नवसारी या गाडीने सुरतसाठी प्रस्थान केले . सुरतला आल्यावर गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिकमार्गे शिर्डीला (सुरतहून शिर्डीला जाणाऱ्या  गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रामुख्याने सुरत साक्री सटाणा मनमाड मार्गे  जातात ) जाणाऱ्या गाडीने नाशिकला परत आलो . आणि माझ्या एका दिवशीय बदोडा दर्शनाची अखेर केली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -

मराठवाड्यातील एक दिवस