मराठवाड्यातील एक दिवस

 


मी पुण्यात असताना, दर शनिवारी सायंकाळी एसटी बसने फिरायला जात असे .शनिवारी आँफिस सुटले की मी घरी जाता बसस्टँडवर जात असे. तेथून बस पकडून दुसऱ्या गावात जावून रविवारी सायंकाळी चार पाचपर्यत त्या गावात फिरुन पुन्हा पुण्यात येत असे, आणि सोमवारी पुन्हा आँफिसमध्ये रुजु होत असे.त्यावेळी मी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे  या जिल्ह्यात भरपूर भटकलो.मात्र पुणे सुटले, आणि यात बराच खंड पडला ,मात्र सध्या कोव्हिड 19संपल्याने आणि माझ्या प्रवाश्याचे प्रमुख साधन असलेली एसटी पुन्हा जोमाने सुरु झाल्याने  मी आता या फिरण्याचा पुन्हा प्रारंभ करत आहे.ज्याची सुरवात मी 15 मे रोजी जालना जिल्ह्याला भेट देवून केली.

    मी जालना या ठिकाणची  फिरण्याचे ठिकाण म्हणून निवड   नविन जाणून घेण्याची उत्सुकता तसेच जाण्यायेण्याचा वेळ ,आणि एकुण वेळेची उपलब्धता या निकषांवर केली.माझ्या  होम टाउन असलेल्या

नाशिकचा.विचार करता मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या औरंगाबाद या जिल्ह्यातील भद्रा मारुती, पैठण, अजिंठा वेरुळ, घुष्णेश्वर ,बिबिका मकबरा आदी स्थाने या आधी बघीतल्याने काहीतरी नवे असावे, म्हणून मी जालना जिल्हा निवडला.

    माझ्या या फिरण्याची सुरवात जालना जिल्ह्याच्या प्रशासनाचे अधिकृत संकेतस्थळ जालना डाँट जिओव्ही डाँट इन यावरुन जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेवून झाली. या माहितीवरुन मी पुढिल स्थाने निवडली.राजूर येथील साडेतीन गणपती स्थानांपैकी एक असलेले गणपती मंदिर, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ असलेले जांब समर्थ आणि अंबड येथील देवीचे मंदिर. मी फिरण्यासाठी स्वतःचे वाहान वापरता एसटी बस वापरत असल्याने मला प्रत्यक्ष फिरताना मला वाहतूकीच्या असुविधतेमुळे अखेरचे स्थान बघता आले नाही असो.

माझ्या प्रत्यक्ष फिरण्याची सुरवात झाली, नाशिकच्या ठक्कर बसस्टँड येथून मुंबई पुसद या स्लिपर आणि सिटर एकत्र असणाऱ्या बसमधून .या बसने मी जालन्यास आलो. आपल्या एसटीमार्फत सिटर आणि स्लिपर एकत्र ही सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक सिटजवळ.मोबाईल चार्जिंगची सोय देण्यात आली आहे. खाली असलेले बसायचे सिट पुश बँक प्रकारचे सर्वसामान्य सिटापेक्षा आरामदायी मोठे आहेत. ज्यासाठी आपल्या
साध्या बससेवेपेक्षा सुमारे 30%अधिक भाडे द्यावे लागते .गुजरात राज्यात जाणाऱ्या बसेसचा अपवाद सोडला तर दोन्ही प्रकारच्या सिटसाठी सारखेच भाडे द्यावे लागते.गुजरात राज्यात जाणाऱ्या बसेसमध्ये स्लिपरसाठी जास्त पैसे खर्चावे लागतात.

 रस्ता छान होता.कोणी कितीही मोदी विरोधक असो किंवा समर्थक जो फिरतो त्यास सध्या काही  मोजके अपवाद वगळता  रस्त्याचा दर्जा पुर्वीपेक्षा सुधारल्या असल्याचे मान्यच करावे लागेल.माझी गाडी  वैजापूर येथे आल्यावर नाशिक औरंगाबाद रस्त्यातील या शेवटच्या टप्यातील रस्त्याचा  दर्जा मात्र खराब असल्याने गाडी गंगापूर येथून सोलापूर महामार्ग या रस्त्याने औरंगाबाद येथे आली. तेथून जालना येथे आली.जालना बसस्टँड परीसर काहीसा अस्वच्छ आहे. मात्र अन्य शहर मात्र बरेच स्वच्छ

असल्याचे गावातून फिरताना लक्षात येते.सकाळी उठल्यावर गावातून थोडे फिरणे झाल्यावर माझ्या प्रत्यक्ष फिरण्यास सुरवात झाली.

   मी माझ्या पर्यटनाची सुरवात राजूर गणपतीच्या दर्शनाने केली. राजूर हे गाव जालना सिल्लोड या रस्त्यावर जालना शहरापासून 25किलोमीटरवर आहे. मंदिर काहीसे उंचावर आहे. नाशिकच्या संदर्भात बोलायचे झाल्यास मधली होळी किंवा एकमुखी दत्त येथील चढ इतक्या उंचीचा एका टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिर दगडात बांधलेले आहे. परीसरात अन्य काही मंदिरे देखील आहेत. मात्र या सर्व मंदिरांना मुळच्या दगडी स्वरुपात ठेवता आँइल पेंटचा रंग देण्याचे कार्य चालू आहे. मुळच्या दगडी सौदर्याला काय चांगला फरक यामुळे पडतो, ते मंदिर प्रशासनच जाणे ?मला वैयक्तिक स्वरूपात हा प्रकार आवडत नाही, असो .सात.वर्षापूर्वी मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले.त्यावेळी सुरक्षेची विशेष काळजी घेवून जर दुर्घटना झाली तर परीस्थिती नियंत्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे परीसरात फिरताना लक्षात येते. परीसराची स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासन विशेष प्रयत्नशील आहे. ज्याबाबत त्याचे कौतूक करावेच लागेल.मला मंदिर परीसरात सर्वच स्वच्छता कर्मचारी काम करताना दिसले.देवस्थानामार्फत निवासाची सोय आहे. मात्र खाण्याची सोय नाही. भाविकांनी मुक्काम केल्यानंतर आम्ही गावातून त्यांची सोय करतो असे मंदिर व्यवस्थापकांनी मला सांगितले मला मात्र गावात एकच हाँटेल  असल्याचे गावातून फिरताना गावकऱ्यांनी  सांगितले, त्यामुळे पोटाची सोय उत्तम नाही, याचे भान ठेवूनच गणपती दर्शनासाठी येणे उत्तम आहे.

     औरंगाबाद येथून जालन्यास दोन मार्गाने येता येते पहिला मार्ग म्हणजे सिल्लोड मार्गे आणि दुसरा मार्ग म्हणजे बदनापूर मार्गे त्यातील पहिल्या मार्गे आल्यास जालन्याचा आधी 25किमीवर मंदिर आहे. दुसऱ्या मार्गाने आल्यास जालना शहरात जावून तेथून सिल्लोडच्या रस्त्याने यावे लागते .दुसऱ्या मार्गाने येताना मला निर्मणाधीन  समृद्धी महामार्ग दिसला ही गोष्ट दिसला माझ्या मते येवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.

गणपती दर्शनानंतर मी समर्थ रामदास रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ असलेल्या जांब समर्थ या तिर्थक्षेत्राकडे मोर्चा वळवला. अंबड या तालूक्याच्या मुख्यालयापासून  परतूर तालूक्यातील आष्टी या गावात जाणाऱ्या रस्त्यावर घनसांंगवी तालूक्यात हे देवस्थान आहे. हे तिर्थस्थान विशेष प्रसिद्ध नाही, हे मला अंबड या गावात आणि राजूर या गावात या विशषी चौकशी करताना समजले असो .

अंबड या गावातून गेवराइला जाणाऱ्या रस्त्यावर महाराणा प्रताप चौकातून डावीकडे वळल्यावर आपण जांब समर्थच्या रस्त्यावर येतो.या चौकात एक वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. स्वतःच्या वाहनातून येणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत महत्तावाची गोष्ट आहे. या रस्त्यावर तिसरे मोठे गाव म्हणजे कुंभारी पिंपळगाव (पहिले डोंगसौदरी, दुसरे मच्छिंद्रनाथ चोटी ) .या कुंभारी पिंपळगाव गावापासून नउ किलोमीटरवर जांब समर्थचा फाटा लागतो(रस्त्यावर फलक आहे) तेथून आतमध्ये दिड दोन किलोमीटर गेल्यावर गावाच्या सुरवातीलाच मंदिर आहे.

मंदीर परीसरात भक्तनिवास्याची आणि प्रसादाची सोय आहे. मी स्वतः तिथेच जेवलो.दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दरम्यान येथे प्रसाद देण्यात येतो.मात्र तिथे विशेष गर्दी नसल्याने, अन्न वाया जाउ नये यासाठी मंदीर प्रशासनातर्फे मोजका प्रसाद तयार करण्यात येतो.आपणास प्रसाद पाहिजे  असल्यास एक तास आधी प्रसाद पाहिजे असे सांगावे लागते, असो.

       जांब समर्थ या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था फारशी उत्तम नाही. स्वतःचे वाहन नसल्यास त्रास होणार याची मनाची तयारी करूनच यावे असे माझे आपणास सांगणे आहे. अंबडपासून कुंभारी पिंपळगाव पर्यत

उत्तम बससेवा आहे पुढील नउ किलोमीटचा प्रवास खुपच त्रासादायक आहे.. या नउ किलोमीटरमध्ये बससेवा नाही. जीपवाले तूमचे कपडे बघून भाडे सांगतात. ते 300 ते 500 रुपये असू शकते.जर तूम्ही भाग्यवान असला तर कुंभारी पिंपळगाव येथून गेवराई(जि.बीड)  परतूर मार्गावरील बससेवेच्या माध्यमातून आपण जांब समर्थ फाट्यापर्यत जाता येवू शकतात.मला स्वतःला मी एसटीतून फिरत असल्याने पुर्व नियोजीत वेळापत्रकात बदल करावा लागला.

जांब समर्थ या ठिकाणापासून जवळचे रेल्वे स्टेशन 35 किमीवरील परतुर आहे. मी परतुर येथे गेलो असता समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मस्थळी जाण्यासाठी येथे उतरा असा बोर्ड तेथील रेल्वे स्थानकावर दिसला.

सार्वजनिक वाहतूकीच्या दुरावस्थेमुळे मला मुळच्या वेळापत्रकात. बदल करुन तेथूनच माघारी फिरावे लागले. त्यामुळे तेथून परतूर आणि परतूरहुन रेल्वेने औरंगाबाद आणि औरंगाबाद येथून बसने नाशिकला आलो.

  मी नाशिकला येताना नाशिक रस्त्यावरील औरंगाबाद ते वैजापूर या मार्गाने आलो रस्ता बराच खराब आहे.या प्रवास्या दरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील रेल्वेची दुरावस्था .परतूर ते औरंगाबाद या दरम्यान अजूनही डिझेलवर चालणाऱ्या एकाच ट्रँकवरुन दोन्ही बाजूच्या रेल्वे जातात. त्यामुळे काही वेळेस सायडींगला जावे लागण्याची दाट शक्यता आहे. मला स्वतःला थोड्याच वेळेसाठी मात्र तीनदा  थांबावे लागले. मराठवाड्याचा रेल्वेप्रश्न सुटणे अत्यावश्यक आहे. रेल्वेच्या बाबत  अधिक बोलायचे झाल्यास मला जालना शहरात आणि राजूर गावात ठिकठिकाणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या रेल्वे विकासाच्या कामासाठी त्यांचे अभिनंदन करणारे बोर्ड दिसले ज्यात जालना जळगाव  नविन रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण, विद्युतीकरण यासाठी निधीची तरतूद याबाबी प्रामुख्याने होत्या. जेव्हा.हे  प्रकल्प प्रत्यक्षात येतील तो सुदिन असेल मराठवाड्यासाठी असे मला वाटते. तो लवकरात लवकर येणे आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा भाग्यकारक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )