पोस्ट्स

गुजरात लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

इमेज
जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली‌.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.      आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो‌. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते‌.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही‌. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.      वलसाड...

रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'

इमेज
 रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन                   तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन, पर्यटन करत असे  मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती.  मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०...

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

इमेज
    मी नुकतीच म्हणजे वार रविवार , 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा ) या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली , ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी   शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी , सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला   जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या    दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150 किमीवर ...

मला भावलेले सुरत (भाग 2) -

इमेज
   मी सातत्याने नाशिक पुणे प्रवास करतो . रस्तेमार्गे होणाऱ्या कंटाळवाण्या प्रवासावर तोडगा म्हणून मी पूर्वी विविध माध्यमे वापरत असे , ज्यामध्ये विविध प्रकारच्या आणि मालकीच्या   बसेसचा समावेश असे . असेच एका प्रयोगात मला गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत या बसचा शोध लागला . मला त्यांची आसनव्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि अन्य खाजगी बसेसपेक्षा अधीक   आरामदायी वाटल्याने आता मी शक्यतो नाशिक पुणे प्रवास याच बसने करतो . सातत्याने प्रवास केल्याने त्या बसच्या  कर्मचाऱ्यांशी माझी मैत्री झाली आहे . त्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी एकदा   त्या बसने सुरत प्रवास देखील केला त्याचे अनुभव तुम्ही या ब्लॉग च्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . त्याच प्रवासादरम्यान मला नाशिक सुरतच्या लोकप्रिय अश्या सापुतारा मार्गाबरोबर पेठ धरमपूर बलसाड   हा   मार्ग देखील माहिती झाला आणि माझी त्या मार्गाने सुरत पुन्हा एकदा बघण्याची उत्सु...