रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'


 रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन 

                 तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन, पर्यटन करत असे  मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती.  मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०२५ रोजी त्यास मुहूर्त लागला, आणि कोणत्याही गोष्टीची सुरवात करताना देवदर्शन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे, त्यानुसार गुजरात राज्यतील डांग जिल्ह्यात असलेल्या शबरीधाम या तीर्थस्थानला भक्तिभावात भेट देत मी पुन्हा फिरण्यास सुरवात केली आहे 

 मित्रानो प्रभू श्रीराम याना माता शबरीने ज्या ठिकाणी उष्टी बोरे खाऊ घातली ते स्थान म्हणजे शबरीधाम.   गुजरात मधील डांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या आहवा या शहरातून महराष्ट्रातील नवापूर या शहारला जोडणाऱ्या रस्त्यावरीवरील सुबीर या डांग जिल्ह्यातील  तालुका मुख्यालयापासून अडीच किलोमीटरवर  हे पवित्र स्थान आहे या स्थळाजवळ, पम्पा सरोवर हे अजून एक तीर्थस्थान आहे मात्र मी सार्वजनिक बसवाहतूक अर्थात एसटी बसने प्रवास करत असल्याने त्यांच्या वेळापत्रकानुसार कार्यक्रम आखावा लागतो या कार्यक्रमामुळे मला यावेळी पम्पा सरोवराला काही भेट देता आली नाही पुढच्या वेळेस माझा या सरोवरला भेट देण्याच्या नक्की प्रयत्न असेल 

         माझ्या या प्रवासाची सुरवात झाली १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नाशिकच्या महामार्ग बस स्थानकातून गुजरात परिवहनच्या गोध्रा आगाराच्या नाशिक ते गोध्रा या एक्सेप्रेस श्रेणीच्या बसने. या बसने मी सापुताराला आलो प्रवाश्यात सहप्रवाश्याने दिलेल्या माहितीनुसार मी  माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करत सापुताराहून वघइ या गावी न जाता  थेट आहवा या शहरात गेलो.  जर मला सहप्रवाशी भेटला नसता तर मी सापुताराहून  वघइला जाऊन तेथून आहवाला येणार होतो ज्यात माझा एक तास जास्तीचा गेला असता. सहप्रवाश्यामुळे तो वाचला तर आहवाहुन मी बडीपाडाला जाणाऱ्या बसने शबरीधामला आलो तिथे व्यवस्थित दर्शन घेत माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आलो असतो, तर कसा आलो असतो हे बघण्यासाठी मी विशेष गरज नसताना वघइला गेलो, आणि तेथून सापुताऱ्याला येत सापुताराहून  नाशिकला परत आलो .


      शबरीधाम हे स्थान एका टेकडीवजा डोंगरावर आहे आपण पायथ्यपासून पाच मिनिटात मंदिरापाशी पोहोचतो . पायथ्यापासून मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. टेकडीच्या माथ्यावर सुमारे  अडीच ते तीन एकर मैदान आहे, आणि या मैदानातच हे स्थान आहे. या ठिकाणी माता शबरी आणि रामाच्या मूर्ती असलेलं एक मंदिर आहे तसेच भगवान महादेवाचे स्थान आहे या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे एका रात्रीसाठी ५०० रुपये आकारण्यात येता.त  पायथ्या ते माथ्यदरम्याच्या रस्त्यावर एक हॉटेल आहे ज्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात तर पायथ्यापाशी दोन छोटी टपरीवजा हॉटेल आहेत 

        आहवा या छोट्याशा शहरापासून गुजरात राज्य परिवहनच्या बडीपाडा या ठिकाणी जाणाऱ्या बसने आपण थेट शबरीधामला जाऊ शकतो. ज्यास एक तास  लागतो.  या प्रवाश्याचे   ३१ रुपयाचे बसचे तिकीट आहे जर ही बस मिळाली नाही तर आहवातुन नवापूर, पिंपळनेर साक्री  या महाराष्ट्रातील गावात जाणाऱ्या बसने सुबीर या गावात उतरून तेथून शबरीधाम ला येऊ शकतो सुबीर ते शबरीधाम हे अंतर सुमारे अडीच किलोमीटर आहे .नाशिकहून आहवा या गावात दोन मार्गाने येता येते एक मार्ग सापुताऱ्याहून आहे दुसरा मार्ग तारहाबादहुन आहे. आहवा ते सापुतारा या मार्गाचे गुजरातच्या एसटी बसचे तिकीट ४६ रुपये आहे.  मात्र या मार्गावर अत्यंत मोजक्या म्हणजे दिवसभरातुन फक्त ५ बसेस आहेत. तर सापुताराहून ६० किलोमीटरवर असलेल्या वघइवरून दिवसभरातून १८ ते २० बसेस आहेत‌.  वघइ ते आहवा गुजरातच्या एसटीचे भाडे ३६ रुपये आहे .आपण  नाशिकहून सुरत बदोडा अहमदाबाद  गोध्रा या सठिकाणी जाणाऱ्या बसने वघइ ला येऊ शकतो. वघइ हे आहवा हे अंतर ३५ किलोमीर असून गुजरातच्या एसटी बसने प्रवास केल्यास त्यास एक तास लागतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नाशिक ते आहवा अशी बस आहे. मात्र तिची वेळ शबरीधाम चे दर्शन घेण्याचा विचार करता फारशी सोयीची नाही  सापुतारा ते नाशिक गुजरातच्या एक्स्प्रेस प्रकारच्या बसचे भाडे १५८ रुपये असून सापुतारा ते वघई या मार्गावरील गुजरात राज्य परिवहनाच्या लोकल स्वरूपाच्या बसने प्रवास केल्यास ४६ रुपये तिकीट असून प्रवाश्यास सुमारे दीड तास लागतो. अर्थात आतापर्यंत मी सांगितलेले तिकिटांचे दर मला आलेल्या अनुभवानुसार आहेत आपण प्रवास कराल तेव्हा त्यात बदल झालेला असू शकतो

मला या संपूर्ण बस प्रवाश्यात आढळलेली गोष्ट म्हणजे गुजरात एसटी महामंडळाचे दर. ज्या प्रवाश्यासाठी आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ ८१ रुपये आकारते, त्यासाठी गुजरात एसटी बस फक्त ३४ ते ३६ रुपये घेते. आपल्याकडे तिकिटावर बसच्या प्रवाश्याचे टप्पे दिलेले असताना त्यामुळे किती भाडे याचा अंदाज येत असला तरी बस प्रवाश्यास कितीवेळ लागेल याचा अंदाज येत नाही गुजराच्या बस तिकिटावर दोन ठिकाणातील अंतर दिलेले असते. त्यामुळे बस प्रवाश्याला किती वेळ लागेल, याचा अंदाज बांधता येतो. आपण गुजरातच्या एसटी महामंडळाची ही  गोष्ट घेयला हवी तसेच मला या प्रवाश्यात शेती योग्य जमीन नसल्याचे आढळून आले तसेच या ठिकाणी बहुतेक सर्वच ठिकाणी पानगळी प्रकारचे जंगल आढळले. या ठिकाणची स्थानिक  डांगी भाषा गुजराती पेक्षा मराठीला अधिक जवळची आहे 

दोन वर्षाच्या विश्रांती नंतर सूर केलेल्या या भ्रमंतीमुळे मला खूपच फ्रेशज वाटायला लागले आहे मी या पुढे सुद्धा फिरायला जाणार आहे अर्थात ते पूर्वीइतके मोठ्या प्रमाणात नसेल मात्र जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा त्याचे प्रवासवर्णन आपणास करेल तूर्तास इतकचं जय श्रीराम  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6