पर्यटनाच्या निमित्याने ......

आपण अनेकना सांगताना बघतो कीमी पर्यटनाच्या निमित्याने  अनेक भागांमध्ये , शहरात फिरतो . मात्र एका प्रश्नाचे ते अजिबात उत्तर देत नाहीत, तो म्हणजे पर्यटन करतात , म्हणजे  ते नक्की काय करतात ? ते ज्या नव्या प्रदेशाना भेटी देतात , तिथल्या लोकांमध्ये सहभागी होतात? तेथील स्थानिक परिवहन व्यवस्थेने फिरतात की ? की तेथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात ? मी स्वतः अनेकदा विविध राज्यांच्या परिवहन सेवा जसे गुजरात राज्य परिवहन महामंडळ , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळ वगैरे . आदींनी फिरतो . मी संबंधित ठिकाणी फिरण्यासाठी प्रामुख्याने सध्या बसेस वापरतो . तसेच बसेसमध्ये शक्यतो खिडकीची जागा घेण्याचा माझा कल असतो . प्रवास रात्रीचा असेल तरी मी प्रवासात शक्यतो झोपत नाही . रात्रीच्या अंधारात काय बघतो ? असा सहप्रवाशांच्या प्रश्न असतो . मात्र मी खिडकीची जागा शक्यतो सोडत नाही . मला मी ज्या शहारत जातो, तेथील ऐतिहासिक स्थळांपेक्षा स्थानिक परिवहन सेवांमार्फत फिरायला आवडते . मी शक्यतो एकटा फिरतॊ . त्यावेळी आलेल्या अनुभवांवरून  मी बोलत आहे .

                         वरील विवेचन वाचून, काही जण मला पर्यटनाचे विविध प्रकार असतात . जसे वैद्यकीय पर्यटन, दुर्गभ्रमंती , निसर्ग पर्यटन , धार्मिक पर्यटन असे प्रकार असतात . हा सल्ला देऊ इच्छतील . मला  त्यांना विचारायचे आहे ?  की पर्यटनाच्या या विविध प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे  पर्यटन केले तरी  ,मुळात प्रश्न उरतोच , पर्यटन म्हणजे काय ? मी अनेकदा फिरायला जातो ते फारशी तयारी करता संबंधित ठिकाणी पोहोचल्यावर त्या ठिकाणच्या चहाची टपरी, न्यूजपेपर स्टॉल आदी ठिकाणी चौकशी करून मी त्या ठिकाणाची बघायची ठिकाणी (जर पर्यटनस्थळे ठरवली तर )तसेच शहर बस मार्ग अथवा त्या ठिकाणी असणारे रेल्वे स्थानक , त्या ठिकाणी असणारी विविध बस स्थानके आदी ठिकाणी मी फिरतो . माझा असा अनुभव आहे की , इंटरनेटवरून माहिती
काढून संबंधित ठिकाणी जाण्यापेक्षा त्या ठिकाणी गेल्यावर चहावाल्याला , न्यूजपेपरवाल्याला विचारून माहिती काढणे अधिक     सोईचे असते . इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीपेक्षा अधिक सखोल, विश्वासार्ह्य माहिती त्यांच्याकडून मिळते . ज्यामुळे आपली त्या ठिकाणाशी अधिक नाळ जुळते . संबंधित ठिकाण आपले अधिक ओळखीचे होते . अर्थात हा माझा अनुभव आहे . प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो , याची मला जाणीव आहे . जर कोणी इंटरनेटवरून माहिती काढत विविध ठिकाणी आगाऊ आरक्षणे करत जर प्रवासाचे स्वागत करत असेल तर त्याने त्या प्रकारे प्रवास सुरु ठेवणे सोईस्कर आहे . मात्र नव्याने पर्यटन सूर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने मी म्हणतो मार्ग अनुसरणे अधिक उत्तम आहे .

                   पर्यटनामुळे आपणास विविध गोष्टीचे ज्ञान होते , जे आपणास 100 पुस्तके लेख वाचून देखील मिळणार नाही . मी अनेकदा खिडकी शेजारील आसनावर बसून प्रवास करत असल्याने मला रस्त्याची कामे कशी सुरु आहेत  ? हे कळते सध्याचे सरकार आपण आपण रस्त्यासारख्या पायाभूत सेवेवर प्रचंड प्रगती करत असल्याचे सातत्याने सांगते . त्यातील वस्तुस्थितीचा अंदाज आपणास त्यामुळे सहजतेने येतो .  त्याच प्रमाणे संबंधित प्रदेशात कोणत्या प्रकारची पिके अधिक घेतली जातात . याचे कोणतेही पुस्तक वाचता सहजतेने ज्ञान होते . ज्याचा मला माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रचंड फायदा होतो . माझ्यामते पर्यटन म्हणजे आपले अनुभव विश्व  अल्पश्या कालावधीत अधिक मोठया प्रमाणात विस्ताराने हे होय . आपणास काय वाटते  ? आपली पर्यटनाची व्याख्या काय ? मी  तुमची पर्यटनाची व्याख्या जाणून घेण्यास इच्छूक आहे . तुमची पर्यटनाची व्याख्या काहीही असो , तुम्ही पर्यटन कराच

असे  मला वाटते . पर्यटनामुळे विविध लोकांना रोजगार मिळतो . सध्याचा मंदीचा काळात  सर्वसामान्य व्यक्तीकडून जर मंदी करायची असेल ?,तर मंदी दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणून या कडे बघावे लागेल . तुम्ही पर्यटनाच्या निमित्याने लांबवर जाण्याची आवश्यकता नाही . आपल्या राहत्या घरापासून दोनशे किलोमीटरच्या परिघात तुम्ही फिरले तरी ते पर्यटन म्हणूनच गणले जाईल तर मग कधी बाहेर पडताय  पर्यटनासाठी ?  ......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

मराठवाड्यातील एक दिवस