पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १०(मला प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि समस्या )

         

 मी एसटी बसचा वापर करतो,हे एव्हाना आपणास माहिती असेलच.एसटीच्या उपलब्धतेनुसार माझ्या पुर्वनियोजित कार्यक्रमात बदल देखील होतो हेही आपणास माहिती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.काही अत्यंत तूरळक घटनांचा अपवाद वगळता हे बदल खुपच किरकोळ स्वरूपाचे असतात.काही अत्यंत अपवादत्मक घटनेत मात्र हे बदल पुर्णत:180अंशात माझी भटकंती 100 टक्के बदलणारे असतात. असाच एक फिरणे 100 टक्के बदलण्याचा अनुभव मला गेवराईच्या फिरण्याचा दरम्यान आला.माझे आजचे लेखन तो अनुभव आपणापर्यत पोहोचवण्यासाठी
         तर मित्रांनो, पुणे शहरातून गेवराईला जाण्यासाठी मी पुणे ते आहिल्यानगर आणि तेथून पुढे अहिल्यानगर ते गेवराई असे नियोजन केले होते. मी नगरला जाण्यासाठी निवडलेली बस कर्नाटक ची असल्याने ती माळीवाडा किंवा स्वस्तिक बसस्टँडला न येता तारकपूर बसस्टँडवरुनच पुढे शिर्डीला जणार होती.त्यानुसार मी तारकपूर बसस्टँडला सकाळी साडेसहा वाजता आल्याने चौकशी खिडकी बंद होती.त्यामुळे तेथील एका कंडक्टरला गेवराई बसेस कोठून सुटतात असे विचारल्यावर  त्यांनी माळीवाडा असे उत्तर दिल्याने मी माळीवाडास गेलो.या दरम्यान मी बसस्टँडवर असलेल्या  हॉटेलमधून ब्रेकफास्ट करणे सार्वजनिक बाथरूममध्ये आंघोळ करणे या गोष्टी केली.
यामध्ये सुमारे तासाभराच्या  वाया गेल्या.त्यामुळे जेमतेम १० मिनीटात पोहचू  शकणाऱ्या माळीवाडाला मी सव्वा तासाने पोहोचलो.माळीवाडाला आल्यावर मी गेवराईची चौकशी केली असता दोन बसेस आताच गेल्याचे आणि पुढील बसेस दिड तासाने असल्याचे सांगितले. 
बस दीड तासाने असल्याने माझे नियोजन विस्कळीत झाले होते .त्यातच नुकत्याच दोन बसेस गेल्या आहेत तसेच पुढची बस दिड तासाने असल्याने मी बेक्रफास्ट आणि फ्रेश होण्याचा वेळ का  वाया घालवला या मुद्द्यावर स्वत:वरच चिडचिड करत, मी माळीवाडा  बसस्टँडवर असताना मला एका सह प्रवाशाने कल्याणला जाणारी बस किती वाजता असे विचारणा केली. दुसऱ्या प्रवाशाने विचारणा केल्याने, माझा मनात विचार चमकून गेला की,अरे आपल्या बकेट लिस्टमध्ये अहिल्यानगर- कल्याण रस्त्यावरून फिरणे देखील आहे. आपण त्या साठी प्रयत्न का करू नये .विचारानुसार मी पुन्हा तारकपूर बस स्टॅण्डला येऊन त्या सह प्रवाश्योसोबत कल्याण सोबत प्रवास केला. या प्रवाश्यात मला माळशेज घाटातले निसर्ग सौदर्य अनुभवता आले‌. 
कल्याणला पोहोचवल्यावर पुन्हा फ्रेश होऊन मी शहर दर्शनाला सुरूवात झाली.काही वेळाने माझी परत जाण्याची वेळ झाल्याने मी रेल्वेस्थानकडे वाटचाल सुरु केली त्यावेळेस मला चोपडा -पनवेल बस समोर स्वागतालाच उभी असणारी दिसली त्यावेळी माझ्या मनात आले कि आतापर्यंत आरामात प्रवास झालाच आहे त्याला रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करत अडचणीत का टाकायचा .त्या विचारानुसार मी पनवेलला जाण्याचे ठरवले आणि त्यानुसार मी
पनवेलच्या बसमध्ये पोहोचलो मुबईहून पुणे शहराला जाणाऱ्या बसेस आणि ठाणे शहरातून येणाऱ्या बसेस पनवेलला एकत्र येतात त्यामुळे पनवेल शहरातून पुणे शहरात जाण्यासाठी अनेक बसेस्ड उपलब्ध असतात त्यामुळे तेथून आरामात प्रवास करता येईल असे माझे नियोजन होते मात्र त्यामध्ये एक नाट्य घडणार होते 
तर मी पनवेलला आलो.  पुण्याला जणाऱ्या बसेस मोठ्या संख्यने दिसू लागल्या  मात्र जी बस बघावी ती आधीच भरलेली म्हणजे माझ्या गृहीतकाच्या विरोधातच मग काय करावे ? याचा मी विचार करत असतानाच मला ठाणे  शहरातून बस पकडण्याची इच्छा झाली आणि त्यानुसार मी ठाणे शहरासाठी निघालेलो त्यावेळी ठाणे पनवेल लोकल बंद असल्याने मला बसने जाणे क्रमप्राप्त झाले मी बसने ठाणे शहरासाठी निघालो आणि नाट्याला सुरुवात झाली माझा मोबाईल बिघडला दोनच दिवसापूर्वी एटीएम कार्ड तुटले हो त्यामुळे माझ्याकडे मोजकेच पॆसे होते आणि आता  त्याच  पैस्यात मला ठाणे शहरातून पुणे शहरात जायचे होते.  मात्र माझा पुण्यसाठीचा प्रवास सुरूच झाला नव्हता . आणि त्याचा आधी कधीही ठाणे ते पुणे  प्रवास केला नसल्याने ठाण्यातून शेवटची बस कधी असते हे मला माहिती नव्हते. मात्र  माझे दैव बलवत्तर असल्याने ठाणे  शहरात माझा मोबाईल अर्ध्या तासात दुरुस्त होऊन मी ठाणे शहराच्या वंदना बस्टॅंडवरून आरामात पुणे शहराकडे निघालो खरा मात्र अजून नाट्य संपले नव्हते लोणावळ्याजवळ बस बंद पडली मात्र अर्ध्या तासात दुसरी बस मिळाल्याने माझा प्रवास सुरु झाला . आणि एका वेगळ्या प्रवासाची सांगता झाली.

 



पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ९ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८  वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2026/02/blog-post.html

 पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ७ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2026/01/7_11.html 

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ६ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/6.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ५ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा करा https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post_16.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ४ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ३ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2023/11/blog-post.html



https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2022/11/blog-post_26.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2020/02/blog-post.html


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५