पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ९ (माझे आवडते पर्यटनस्थळ )



मला अनेकजण विचारतात . अजिंक्य,  तू इतके फिरतो, त्यातील तुझे सर्वात आवडते पर्यंटन स्थळ कोणते ? माझे आजचे लेखन या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. तर मित्रांनो माझ्या आवडीची अनेक स्थळे आहेत.काही स्थळे मला तिथे जाण्याची आणि राहण्याची  सोय फार उत्तम असल्याने आवडली आहेत. काही स्थळे तेथील निसर्ग सौदर्यांमुळे आवडली आहेत. तर काही तिथे गेल्यामुळे मिळणाऱ्या शांततेमुळे आवडली आहेत. तरी या सर्वांचा एकत्रित विचार करता मला आवडलेले सर्वात उत्तम स्थळ आहे . गुजरातच्या डांग जिल्हयात असणारे सुब्बीर या तालुक्या मुख्यालयाच्या जवळ असणारे शबरीधाम - पम्पा सरोवर  हे ठिकाण .या ठिकाणी मी गेल्या वर्षी 2025 ला एप्रिल 13 रोजी भेट दिली.


नाशिकहून गेल्यास एका दिवसात सहज फिरून होण्यासारखे हे ठिकाण आहे .ज्यांना नाशिकहून १५० किमीच्या च्या परिसरातील स्थळे बघायची आहेत जी फारशी परिचित नाहीत त्याच्यासाठी स्वर्ग म्हणून हे स्थळ बघता

येईल,मंदिर अर्ध्या तासात सहज बघून होते तसचे तलाव देखील एका तासात सहज बघून होतो त्यामुळे जायला  येयला प्रत्येकी २ तास स्थलदर्शनाला एक ते दीड तास आणि अन्य एक तास सात ते आठ तासात आपले हे पर्यंटन सहज पूर्ण होते रस्ता ऊत्तम आहे त्यामुळं ड्राइव्हिंग चा त्रास होत नाही आपण सहजतेने साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन चालवू शकतो मात्र आदिवासी भाग असल्याने रस्ता छोटा आहे रस्ता ऊत्तम असला तरी यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे धोक्याचे ठरू शकते तर किमान एकदा तरी भेट द्याच ना जाणे माझ्यासारखे आपणाला देखील हे स्थळ आवडू शकते 

      रामायणात  वनवासी असलेल्या शबरीची उष्टी बोरे प्रभू श्रीरामाने जिथे खाल्ली ते हेच ठिकाण आहे.महाराष्ट्र गुजरात या राज्याच्या सीमेवर  आदिवासी पट्ट्यात असलेल्या या ठिकाणी नाशिकहून जायला फार उत्तम आहे, असे म्हणता येईल अशी व्यवस्था नसली, तरी फार त्रास होईल अशी व्यवस्था देखील नाही.  दहापैकी मार्क देण्याचे ठरवले तर जाण्याच्या सोयीस  दहापैकी सुमारे पावणे सात ते सव्वा सात मार्क देता येईल. राहण्याच्या सोईबाबत दहापैकी साडेपाच ते पावणेसहा मार्क देता येईल. निसर्ग आणि गेल्यावर मिळणाऱ्या शांततेचा विचार करता या ठिकाणास साडेआठ ते सव्वा नऊ मार्क देता येतील 


नाशिकहून सापुतारामार्गे गुजरात राज्यात जाणाऱ्या बसने वघइला उतरवून तेथून आहवा मार्गे नवापूर सटाणा,तारहबाद या गावांना जाणाऱ्या बसने आपण सुब्बीर या गावी जाऊ शकतो.तेथून हाकेच्या अंतरावर ही स्थळे आहेत. या ठिकाणी शबरी मातेचे मंदिर आणि एक तलाव आहे .तलावाला अगदी एप्रिल मी महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी असते. परिसर उष्ण आणि कोरड्या हवेचा असला तरी येथील स्थिती मोठ्या प्रमाणात उत्तम आहे.   शबरीधाम हे स्थान एका टेकडीवजा डोंगरावर आहे. आपण पायथ्यपासून पाच मिनिटात मंदिरापाशी पोहोचतो . पायथ्यापासून मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. टेकडीच्या माथ्यावर सुमारे  अडीच ते तीन एकर मैदान आहे, आणि या मैदानातच हे स्थान आहे. या ठिकाणी माता शबरी आणि रामाच्या मूर्ती असलेलं एक मंदिर आहे तसेच भगवान महादेवाचे स्थान आहे या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे एका रात्रीसाठी ५०० रुपये आकारण्यात येतात  . शबरीधाम या टेकडीच्या पायथ्यपासून समोरच्या दिशेने चार किलोमीटर रस्ता जातो रस्त्याच्या शेवटी पम्पा सरोवर आहे. जे भगवान श्रीरामाने आपला बाण मारून तयार केले अशी भाविकांची श्रद्धा आहे 

 नाशिकहून गेल्यास एका दिवसात सहज फिरून होण्यासारखे हे ठिकाण आहे .ज्यांना नाशिकहून १५० किमीच्या च्या परिसरातील स्थळे बघायची आहेत जी फारशी परिचित नाहीत त्याच्यासाठी स्वर्ग म्हणून हे स्थळ बघता येईल,मंदिर अर्ध्या तासात सहज बघून होते तसचे तलाव देखील एका तासात सहज बघून होतो त्यामुळे जायला येयला प्रत्येकी २ तास स्थलदर्शनाला एक ते दीड तास आणि अन्य एक तास सात ते आठ तासात आपले हे

पर्यंटन सहज पूर्ण होते रस्ता ऊत्तम आहे त्यामुळं ड्राइव्हिंग चा त्रास होत नाही आपण सहजतेने साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन चालवू शकतो मात्र आदिवासी भाग असल्याने रस्ता छोटा आहे रस्ता ऊत्तम असला तरी यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे धोक्याचे ठरू शकते तर किमान एकदा तरी भेट द्याच ना जाणे माझ्यासारखे आपणाला देखील हे स्थळ आवडू शकते 

 पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८  वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2026/02/blog-post.html

 पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ७ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2026/01/7_11.html 

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ६ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/6.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ५ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा करा https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post_16.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ४ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

 https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2024/02/blog-post.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ३ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2023/11/blog-post.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक २  वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2022/11/blog-post_26.html

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १ वाचण्यासासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartetraveller.blogspot.com/2020/02/blog-post.html




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५