एक दिवस रावसाहेबाच्या नगरीत


मराठीतील एक ख्यातनाम सिद्धहस्त लेखक म्हणून आपण पु. ल. देशपांडे  यांना ओळखतो.  पु. ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ या लेखनासह त्यांनी आपल्या प्रतिभेने साकरलेली व्यक्तिचित्रे सुद्धा मोठ्या संख्येने प्रसिद्व आहेत.या व्यक्तिचित्रांपैकीच एक म्हणजे सहज बोलता बोलता  शिव्या देणारे, प्रचंड तिखट खाणारे मात्र आतुन अत्यंत प्रेमळ स्वाभाव असणारे बेळगावचे रहिवासी रावसाहेब. बेळगाव,  आपल्या मराठी भाषिकांची अस्मिता, जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजे बेळगाव.तर या बेळगावला मी नुकतीच माझ्या 'एक दिवशीय भ्रमंती' या उपक्रमाद्वारे भेट दिली. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे सार मंडण्यासाठी प्रस्तूत लेखन
तर वाचक मित्र मैत्रींणोंनो, माझ्रा एकदिवशीय भ्रमंतीची सुरवात नेहमीप्रमाणे झाली ती रात्री अकरा वाजता, पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या शिर्डी -बेळगाव नॉन एसी स्लिपर बसने. या बसने प्रवास करत पावणे सहाच्या सुमारास मी बेळगावच्या बसस्टँडवर पोहोचलो.बेळगावचे बसस्टँड मोठे असून या ठिकाणी ३७ प्लॅटफॉर्म आहेत.मी गेलो त्यावेळी नुकतेच उजाडत होते.माझ्या आतापर्यंत अनुभवानुसार परक्या गावी जो पर्यंत पूर्णतः  उजाडत नाही तो पर्यंत रिक्षावाल्यांशी बोलल्यास फसवणूकीची
शक्यता असते‌.तरी अश्या परिस्थितीत बसस्टँडवर घुटमळणे हाच उत्तम उपाय असतो. मी देखील हेच करत  संपूर्ण बसस्टँड बघणे आणि थोडे आसपास भटकणे आदी करत सुमारे एक तासाने बऱ्यापैकी उजाडल्यावर शहर भ्रमंतीस सुरुवात केली‌. 
मी सर्वप्रथम बघितले ते बेळगावचे हरीमंदिर. बेळगावच्या स्थानिक बसच्या  क्रमांक १ च्या बसने आपण दहा मिनीटात बसस्टँडपासून हरिमंदिरापर्यत पोहोचतो. हरिमंदीराची मुख्य शाखा असून देखील मंदिर साधेच, कलावती आईंच्या अन्य मंदिरांसारखे‌ आहे‌.मी आलो तेव्हा तिथे प्रातकालीन भजनसंध्या सुरु होती.मी पण त्यात सहभागी झालो. खुपच आनंददायी अनुभव होता.मी शाळेत शिकत असताना नाशिकच्या रामवाडी येथील हरीमंदिरात मी सहभागी होत असे त्याचा आठवणी जाग्या झाल्या.
 बसस्टँडपासून ३ते ४ किलोमीटर दूर असलेल्या हरीमंदिरापर्यत पोहचवण्यासाठी बसस्टँडपासून २० रुपयांचे स्थानिक बसवाहतूकीचे तिकीट आहे‌. जे माझ्यामते काहीसे जास्त आहे. ही सेवा नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या मार्फतच चालवली जाते.या बसेसला गुजरात राज्य परिवहनाच्या बसेसला असलेल्या निळ्या रंगाशी मिळताजूळता असलेल्या रंगामध्ये रंगवण्यात आले आहे. हरी मंदिरापासून सुमारे २०० मिटरवर एक चौक आहे,या चौकात उभे राहिल्यास आपणास शेअर रिक्षेचा पर्याय देखील उपलब्ध आहे.या शेअर रिक्षा आपणास बसस्टँडपर्यत सोडतात,त्यादेखील २० रूपये आकारतात.
      हरिमंदीरानंतर मी  पुन्हा बसस्टँडवर येत छोटासा ब्रेकफास्ट केला.आणि पुढील भ्रमंतीस सुरुवात केली. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर मी बघितलेली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे काहीसी लांब असल्याने एका दिवसात जाऊन करता येण्यासारखी नव्हती.तसेच बसस्टँड आणि हरीमंदिर परिसरात स्थानिक जनतेला विचारले असता  त्यांनी शहर परिसरात फारशी पर्यटन स्थळे नसल्याचे सांगितले. त्यामुळे शहर बस वाहतूकीचा एक दिवसाचा पास घेऊन शहराचे सर्वसाधरण पर्यटन करण्याचा निर्णय घेतला.
     स्थानिक बस वाहतूकीचे ७० रूपयाचे तिकीट आहे.ते घेउन आपण रात्री बारापर्यत शहर फिरु शकतो.तेच घेऊन मी बेळगाव शहरात फिरायला सुरूवात केली.दुकानाच्या पाट्यांचा विचार करता आपण बेळगाव शहराला तीन भागात विभागू शकतो. बेळगावच्या काही भागात मराठी पाट्या खुप मोठ्या संख्येने दिसल्या, त्यास पहिला भाग म्हणता येईल.जो मी फिरलेल्या भागाच्या सुमारे ३० टक्के भाग होता. दुसऱ्या भागात मराठी आणि कन्नड दोन्ही
भाषेतील पाट्या होत्या हा भाग सुमारे ४०टक्के होता. तर पुर्णत: कन्नडपाट्या असलेला भाग ३० टक्के होता.मी संपुर्ण बेळगाव बघीतले नाही, मात्र शितावरून भाताची परीक्षा या म्हणीनुसार संपुर्ण बेळगावध्ये हेच चित्र असेल असे मानयला हरकत नसावी.मात्र संपुर्ण शहरात चौकांची आणि रस्त्या़ची नावे मराठी कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिहलेली आढळली. 
मी जेव्हा इतर ठिकाणी जातो तेव्हा मी तेथील जवळपास तीन ते चार स्थानिक पेपर विकत घेत असतो,आठवण स्वरूपात.मात्र यावेळी  मला बसस्टँड परिसरात पेपर स्टॉल न दिसल्याने आणि हरीमंदिरात भजन करत असल्यामुळे सकाळचे साडेआठवाजता बेळगाव शहर दर्शनास सुरुवात केली.या सर्वांचा परिणाम म्हणून हरिमंदिर परिसरातील न्युजपेपर स्टॉलवर एकच पेपर दिसला तो म्हणजे बेळगाव तरुण भारत. मी तोच विकत घेतला अन्य मराठी पेपर विकत घेऊ शकलो नाही.मी न्युजपेपर विकत घेतला त्यावेळी स्टॉलवर गर्दी असल्याने इतर मराठी पेपरविषयी विक्रेत्याशी बोलू शकलो नाही.
मी बस वाहतुकीने फिरताना मला दिसले की मुख्य शहरात भलेही मराठी पाट्या कमी असतील मात्र खेडे गावात मराठी पाट्या मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापूरमध्ये लोकांच्या बोलण्याचा पद्धतीमुळे लोक कोणत्या भाषेत बोलत आहेत,हे काहीसे समजते‌.ती पद्धत बेळगावला उपयोगी न पडल्याने माझ्या अवतीभोवती असणारे लोक कोणत्या भाषेत फिरत आहे ते समजले नाही‌.
मी फिरत असताना सहज अंदाज यावा म्हणून बसस्टँड ते रेल्वे स्टेशन आणि परत अशी रिक्षा केली या दरम्यान रेल्वे स्टेशन ते बस स्टँड वरील रिक्षावाल्याशी बोललो तर त्याने सांगितले पंधरा वीस वर्षांपूर्वीपर्यंत येथे ७०ते ७५टक्के मराठी भाषिक होते आता कर्नाटकच्या इतर भागातून लोक राहायला आल्याने ते प्रमाण आता ६५ते ७०टक्याच्या दरम्यान असेल असो.
बेळगावचे स्थानिक बसवाहतूकीच्या स्टँडवरील प्रासाधनगृह खूपच अस्वच्छ होते.मात्र बाहेरगावच्या बसेस सुटतात ते प्रसाधनगृह मोठ्या प्रमाणात म्हणजे १०पैकी साडेसहा मार्क देता येतील इतके स्वच्छ होते.शहर ठिकठिक १० पैकी मार्क देयचे झाल्यास सव्वा सहाच्या आसपास मार्क मिळवण्याईतके  स्वच्छ होते.असो.शहराच्या बाजरपेठेतून मी फेरफटका मारला आपल्या महाराष्ट्राती ड वर्गाच्या महानगरपालीकेच्या शहराची ज्या प्रमाणे बाजारपेठ असते,त्या प्रमाणे मला बाजारपेठ आढळली.
मला दुसऱ्या दिवशी काम असल्याने मी साडेतीनला काढता पाय घेत कर्नाटकच्या हुबळीहून विजयगडला जाणाऱ्या सध्या बसने  पाहिले कोल्हापूरला आलो त्यानंतर कोल्हापूर ते पुणे या मार्गावर महाराष्ट्राच्या शिवशाही बसने प्रवास करत 'एक दिवस रावसाहेबांच्या नगरीत'या उपक्रमाची यशस्वी सांगता केली.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५