अनेक लष्करी आणि देशासाठी महत्त्वाच्या संस्थांचे माहेरघर- पुणे (भाग 1)
वायुसेना स्टेशन लोहेगाव येथे फायटर विमान (जसे सुखोई) विमाने असतात.पश्चिम भारताच्या हवाई संरक्षण मूल्याची भूमिका हे स्टेशन निभावते.
9 बेस रिपेअर डेपो (9 BRD) हे सुद्धा वायूदलाशी संबंधित महत्त्वाचे केंद्र या परिसरित आहे. लष्करी विमानाचे ओव्हरहॉलिंग येथे होते.एअर फोर्स स्टेशनच्या अंतर्गत काम करणारे सीएसडी कॅन्टीनसुद्धा येथे आहे.
भारतीय लष्करात महिलांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. लष्करात अनेक महत्त्वाचा पदावर आणि महत्त्वाच्या संस्थेत कार्यरत आहेत.या संस्थांपैकी महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या
बॉम्बे अभियांत्रिकी गट आणि केंद्र (BEG)
संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता)
भारतीय सेनेचा अभियांत्रिकी विभाग
ऐतिहासिक व प्रशिक्षण केंद्र
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
GREF केंद्र या संस्था मला विश्रांतवाडी ,लोहगाव परिसरात फिरताना आढळल्या.
मी अनेकदा वाचले आहे की महाराष्ट्रात एन.डी.ए.आहे. मात्र एन.डी.ए मध्ये महाराष्ट्रीयन व्यक्ती खुपच कमी आहेत.मी विश्रांतवाडी आणि लोहगाव,येरवडा परिसरात फिरताना हाच विचार करत होतो.पुणे शहरात देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या संस्था आहेत.मात्र यात मराठी माणूस असेल का ? तसेच किमान एन
डी.ए मध्ये मराठी व्यक्तींचे प्रमाण किती याबाबत चर्चा तरी होते.मात्र या संस्थांमध्ये मराठी, महाराष्ट्रीयन टक्का किती याबाबत चर्चा होताना मला तरी दिसली नाही. मध्यंतरी नागपूर तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत वाचले होते की, एन.डी.ए.तील महाराष्ट्रीयन टक्का झपाट्याने वाढतोय.पुर्वी सारखीच पंजाबी लोकांची एन डी.ए .त गर्दी असली तरी आता एन.डी.ए.त मराठी ऐकु येतेय.विश्रांतवाडी, येरवडा, लोहगावमधील या लष्करी संस्थांचा बाबत देखील ही बातमी ऐकयला आली पाहिजे,असो.माझ्या या फिरण्याविषयी रुममेटशी बोलताना त्याचा एका मित्राने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चांदणी चौकात जाताना लागणाऱ्या रस्त्यावर आणि बावधन परिसरात देखील या प्रकारच्या संस्था असल्याचे समजले. माझी पुणे परिसराची पुढची भटकंती त्या भागातील असेल. ती जेव्हा होईल तेव्हा मी त्या विषयी सांगेलच.तो पर्यंत बाय.टेक केअर.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा