अनेक लष्करी आणि देशासाठी महत्त्वाच्या संस्थांचे माहेरघर- पुणे (भाग 2)

विश्रांतवाडी, येवरडा परिसरातील संस्था बघून झाल्यावर माझी पुणे परिसरातील संस्था बघण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढल्याने, त्यानंतर पुढच्या साप्ताहिक सुट्टीची वाट न बघता खास त्यासाठी सुट्टी काढत दोनच दिवसापुर्वी औंधपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कडेकडेने सुप्रसिद्ध ( स्पष्ट बोलायचे तर वाहतूकीचा प्रश्नामुळे बदनाम झालेल्या) अस्या चांदणी चौकापर्यत प्रवास केला.यावेळी मात्र स्वत:च्या गाडीचा वापर केला. मागच्यावेळेप्रमाणे याही वेळेला पुणे शहराचे एक वेगळेच भव्य स्वरुप दिसले.

प्रामुख्याने पुणे शहर म्हटले की, लोकांसमोर हिंजवडी येथील तसेच मगरपट्टा परीसरातील आयटी कंपन्या समोर येतात.काही म्हाताऱ्या लोकांसमोर टेल्को सारख्या कंपन्या समोर येतात.मात्र या सर्वांपेक्षा पूर्णतः वेगळे पुणे या ठिकाणी आहे.मागच्या वेळच्या प्रमाणे याही वेळी तोच प्रश्न समोर आला.पुणे शहराच्या जवळ असलेल्या याराष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेत मराठी माणूस किती.असो तर वाचक मित्र मैत्रीणीनो मला औंध ते चांदणी चौक या रस्त्याने जातांनामला या वेळी पुढील संस्था दिसल्या.
  Defence Research and Development Organisation चे ऑफिस या ठिकाणी आहे ज्यात  DRDO च्या अनेक प्रयोगशाळा आहेत.ज्यामध्ये क्षेपणास्त्र, स्फोटके, शस्त्र प्रणाली संशोधन मोठ्या प्रमाणात चालते.पाषाण  येथील National Chemical Laboratory संस्था जरी नागरी संस्था असली तरी राष्ट्रीय संशोधनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते भारतातील सुपरकॉम्प्युटिंग व IT संशोधन संस्था म्हणून परिचित असलेली Centre for Development of Advanced Computing दिसली  परम सुपरकॉम्प्युटर याच ठिकाणी विकसित करण्यात आला आहे GMRT प्रकल्पाशी संबंधित . National Centre for Radio Astrophysics या संस्थेचे ऑफिस देखील याच परिसरात आहे त्या शिवाय या परिसराच्या जवळ डॉ जयंत नारळीकर यांच्या वास्तवव्याने पवित्र झालेली आयुका हि संस्था देखील आहे  त्याच्या जवळच दापोडीला  College of Military Engineering ही महत्वाची संस्था आहे   Indian Institute of Science Education and Research Pune ती सुद्धा थोडी वाट वाकडी करत बघितली भारत सरकारचे प्रमुख विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थान म्हणून ओळखली जाणारी  Indian Institute of Science Education and Research Pune सुद्धा याभागातील एक महत्त्त्वाची संस्था आहे माझ्यासह हे वाचणाऱ्या अनेकांचे शिक्षण ज्या विद्यापीठात पूर्ण झाले ते सावित्राईबाई फुल पुणे विद्यापीठ देखील याच 
परिसरात आहे 
हे सर्व बघून झाल्यावर मी थोडी वाट वाकडी करत खाण्यासाठी आदी पुणे शहराच्या मुख्य भागाकडे गाडी वळवल्यावर मला प्रभात रोडवर  Film and Television Institute of India चा पाटीने माझे स्वागत केले प्रभात रोडवर खाल्यावर मी पुन्हा एकदा या भागाकडे मोर्चा वळवला खाणे झाल्यावर मी बघितली ही  कोविड-19 संशोधनामुळे विशेष प्रसिद्ध झालेली विषाणू संशोधनातील भारतातील अग्रगण्य संस्था National Institute of Virology ही संस्था . त्यानंतर मी वेगाने गाडी चालवत चांदी चौकाच्या जवळ पोहोचलो आणि या वाहतुकीच्या समस्येमुळे विशेष चर्चेत आलेल्या चौकाच्या जवळ असलेल्या   Central Water and Power Research Station 
 ही संस्था बघत माझी गाडी कोथरूडकडे वळवत रूमकडे प्रस्थान केले  माझे यानंतर पुणे शहरातील पेठांना भेट देण्याचे नियोजन आहे त्यामुळे माझे पुढेच लेखन त्याविषयी असेल.


या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे