पोस्ट्स

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

इमेज
जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली‌.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.      आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो‌. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते‌.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही‌. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.      वलसाड...

रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'

इमेज
 रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी  मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन                   तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय  तीर्थाटन, पर्यटन करत असे  मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत,  पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती.  मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

इमेज
          मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.                    तर मित्रांनो, मी माझ्या पर्यटनाच्या तयारीची सुरवात संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून त्या त्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेवून करतो ,हे आपणास आता ज्ञात झाले असेलच.त्यानुसार माहिती घेत मी सांगली जिल्हा स्थळदर्शनासाठी निघालो असताना नाट्यमय प्रसंग घडला. त्यांचे झाले असे की,   नरसोबाची वाडी हे देवस्थान सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी, प्रशासकीयदृष्ट्या ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर त्याची माहिती नव्हती, आणि मी...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग ५

इमेज
                    मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले.त्यातील काही मी या आधी सांगितले आहेतच .त्यातील न सांगितलेले अनुभव आपल्यापर्यत पोहोचण्यासाठी आजचे लेखन.                  तर मित्रांनो,मी पुण्याहुन सातारा शहरात  जाण्याच्यवेळी एक छोटीसी गंमत माझ्यासवेत झाली.मी पुण्याहुन सातारा शहरात जाण्याच्यवेळी रेल्वेने जावू आणि तेथून परत येताना बसने येवू असे नियोजन केले होते.त्या नियोजनानुसार मी रेल्वेने सातारा शहरात दाखल झालो सातारा शहर हे गावाबाहेर आहे आणि तेथून शहारत येण्याच्या सोयीसुविधा त्यावेळी तरी खूपच तुरळक होत्या आता परिस्थिती कदाचित सुधारली असेल तर मी रेल्वेस्टेशनवर उतरलो.  उतरल्यावर मी प्रसाधनगृहात जावूंन मी ताजवतावाना झालो आणि रेल्वे गेल्यावर सुमारे चार ते प...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग४

इमेज
        मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते,अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले. तेदेखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि   भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच. ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर   व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच. या लेखात माझ्या फिरण्यात ज्या बाबी मला दिसून आल्या त्याविषयी मी बोलणार आहे.     तर मित्रांनो, मी माझ्या फिरण्याची तयारी करताना संबधित जिह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जावून संबंधित जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेत माझ्या फिरण्याचे नियोजन करतो.या दरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे, पालघर जिल्ह्याचा अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याचा वेबसाइट नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडून संचलित करण्यात आलेल्या असल्यातरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल...

पर्यटनाच्या निमित्ताने (भाग३)

इमेज
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात . आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा ( नागपूर प्रशासकीय विभाग ) अपवाद वगळता आपली एसटी जाते अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे . या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले . ते देखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि   भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच . ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर   व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच .    तर माझ्या या प्रवास करण्याची सुरुवात एका अपघाताने झाली . अपघाताने म्हणजे रस्ते , रेल्वेवरील अपघात नव्हे तर माझ्या आयुष्यात अकस्मात घडलेल्या एका घटनेने . जर ती घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर मी जास्त फिरलोच नसतो असे म्हणा हवतर   कारण त्या अपघात अकस्मात घडणाऱ्या घटनेच्या आगोदर मी स्वतः एकट्याने फिरायला गेल्याचे आपणास फारसे आढळणार नाही   तर मी माझे पत्रकारितेचे शिक्षण स...

पर्यटनाची अपार क्षमता मात्र दुर्लक्षित जिल्हा लातूर

इमेज
     आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या ३६ जिल्ह्याचा विचार केला असता  प्रत्येक जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत पर्यटनस्थळांनी आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा समृद्ध आहे .  लातूर सारखा क्षेत्रफळाचा दृष्टीने छोट्या जिल्ह्यात मोडणारा महाराष्ट्राचा एका कोपऱयात असणारा जिल्हा देखील त्यास अपवाद नाहीये . लातूर या जेमतेम पाच तालुक्याच्या  जिल्ह्यात दोन भुईकोट किल्ले , एक लेणी ,एक निसर्ग पर्यटन केंद्र ,एक बालाजीचे मंदिर  , दोन महादेवाची मंदिरे  एक मनमोहक गार्डन , आदी पर्यटनस्थळे आहेत .एसटीचा आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत  नुकतीच या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या  माझ्या या प्रवाशाची सुरवात नेहमीप्रमाणे शनिवारी झाली . शनिवारी पहाटे सकाळी सहा वाजता नाशिक लातूर या बसने मी लातूरसाठी निघालो नाशिकहून लातूरला दोन मार्गे जाता येते एका मार्ग हिंगोलीमार्गे  आहे तर दुसरा मार्ग आंबाजोगाईमार्गे आहे मी नाशिकहून लातूर आणि परत नाशिक या दोन्ही वेळेस  आंबाजोगाईमार्गे प्रवास केला या साठी मला मला नाशिकहून लातूर प्रवासासाठी सव्वा बारातास  तर लातूरह...