आधुनिकता आणि परंपरा यांच्या अनोखा संगम असलेला भाग सहकारनगर आणि कोथरुड

मी सुरुवातीला शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकहून पुणे शहरात राहायला आलो त्यानंतर काही काळ नाशिकला राहिल्यावर पुन्हा नोकरी निमित्ताने पुणे शहरात राहायला आलो शिक्षण आणि नोकरी दोन्ही कालखंडाचा एकत्रित विचार करता मला सध्या पाचहून अधिक वर्षाचा पुणे शहराचा अनुभव आहे .मात्र या संपूर्ण कालावधीत थोड्या महिन्याचा कालावधी वगळता  माझा संपूर्ण वावर टिळकरोड सदाशिव पेठ  फार लांब म्हणायचे झाल्यास दांडेकर पूल आणि महात्मा फुले मंडई य भागातच होता . किंबहुना सदाशिव पेठेत जन्माला आला सदाशिव पेठेतच जगला आणि सदशिव पेठेतच मेला असे माझे जीवन होते . मी जेव्हा माझ्या मित्रांना नाशिकला ते पुणे शहरात कुठे राहतात असे विचारायचो (म्हणजे अजून देखील भेटलो की विचारतो ) तेव्हा ते सांगायचे कि मी हडपसरला राहतो वाघोलीला राहतो नऱ्हेत राहतो . मात्र कॉलेजचे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने सदाशिव पेठेत असल्याने मी पुणे शहरात असून देखील या भागात फार कमी जात असे.  या वेळी मात्र अरे आपण इतकी वर्षे पुणे शहारत राहतोय तरी आपल्याला पुणे शहर अजून पुरते माहित झालेले नाही असे वाटल्याने मी ठरवून ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी पुणे शहराच्या विविध भागाला भेट देत आहे ,हे एव्हना आपल्याला माहितीची झालेच असेल. तर याच सोलो पद्धतीने काढत असेलल्या या ट्रीपमध्ये मी नुकतीच सहकारनगर बिबेवाडी अप्पर, पार्वतीगाव आणि कोथरूड वारजे असा स्वारगेटचा विचार करता काहीसा एल या इंग्रजी अक्षरात असणारा भाग नुकताच बघितला.

 कोथरूड वारजे भाग बघण्यासाठी मी मेट्रोचा एका दिवसाचा पस आणि पीएम पीएमपीएलचा एका दिवसाचा पास वापरला तर सहकारनगर पार्वतीगाव बिबेवाडी अप्पर हा भाग मी माझ्या ऍक्टीव्हावर बघितला.  माझ्या रूमपासून गाडी चालवत स्वारगेट बसस्टँडच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली.  आणि समोर जाऊन १०० रुपयाचा मेट्रोचा एका दिवसाचा पास काढत जिल्हा न्यायालय येथे  मेट्रो बदलत माझ्या कोथरूड वारजे बघण्याच्यामोहिमेचा शुभारंभ केला मेट्रोच्या प्रवासाच्या दरम्यान मी बसचा पास देखील काढला होता माझ्याकडे दिवसभर चालणारे पास असल्याने मला दरवेळी तिकीट काढण्याचा त्रास नव्हता. वाटेल त्या मेट्रो स्टेशनवर उतरायचे हवे तर बस मध्ये  बसायचे बस मधून फिरताना कंटाळा आला तर पुन्हा मेट्रोची वाट धरायची . किंवा पायी पायी फिरायचे या पद्धतीने मी कोथरूड वारजे परिसर बघितला . 

पुण्यातील वेगाने विकसित झालेल्या उपनगरांपैकी एक असलेला  भाग  रुंद  रस्ते, आधुनिक इमारती, आयटी कंपन्यांच्या जवळीक आणि भरपूर कॅफे–रेस्टॉरंट्स यामुळे कोथरूडमध्ये फिरताना मला आधुनिक पुणे शहराची ओळख पटू लागली याच वेळी मयुरेश्वर हॉटेल च्या जवळ बघितलेल्या कोथरूड गाव या परिसरामुळे पारंपरिक पुणेरी देखील मला अनुभवता आले तीच बाब करावं पुतळा परिसरात मी पुन्हा नव्याने अनुभवाला कोथरूड बघून झाल्यावर मी बसने वारजेची वाट धरली कोथरूडच्या तुलनेत हा भाग अधिक शांत आणि निसर्गाच्या जवळ वाटला. मुठा नदीच्या आसपासचा परिसर, हिरवाई आणि टेकड्यांची जवळीक यामुळे वारजे माळवाडीचा वेगळाच अनुभव मिळाला. कोथरूड आणि वारजे भाग मनासारखा बघून झाल्यावर मी परतीच्या प्रवास्याला सुरुवात केली

 स्वारगेट बसस्टॅन्डच्या पार्किंग मधून गाडी घेतल्यावर मला लक्षात आले अरे अजून दिवस शिल्लक आहे . पुण्यात  अजून  काय बघता येईल या विचारात आणि स्वारगेट्च्या ट्राफिक जॅम मधून गाडी चालवत मी सहकार नगरच्या रस्त्याला  लागलो कोथरूड प्रमाणेच सहकारनगर पद्मावती हा भाग पुणे शहराच्या पेठांतरचा विकसित होणारा पहिला भाग आहे माळ यावेळी बऱ्यापैकी मोठे रस्ते  पुणे शहरातील पेठांचा भागापेक्षा अधिक चांगले नियोजन दिसले . येथे आधुनिक जीवनशैली आणि पारंपरिक संस्कृती यांचा सुंदर संगम दिसून येतो. लहान-मोठी दुकाने, शैक्षणिक संस्था आणि निवासासाठी सोयीस्कर परिसर यामुळे सहकारनगर हा भाग श्रीमंत म्हणता येईल असा झाला आहेत्यानंतर मी पद्मावती हा भाग बघून सातारा रस्ता ओलांडून अप्पर आणि बिब्बेवाडी भाग 
बघायला सुरुवात केली  आपल्या भारतात श्रीमंत आणि गरीब भाग एकमेकांच्या शेजारी शेजारी स्वतंत्र्यपणे आहेत .एकंमेकांशी त्यांच्या फारसा संपर्क येत नाही असे म्हणतात या म्हणण्यात वस्तुस्थिती मला अप्पर भागात फिरताना जाणवली. सहकारनगरच्या तुलनेत येथील गरिबी चटकन लक्षात येते काहीसे छोटे रस्ते लोकांच्या अंगावरील कपडे यामुळे आपण सहकारनगरमध्ये नाही हे लगेच समजते ,मात्र बिब्बेवाडी या भागात पून्हा समुर्द्धिचा बेटावर आल्याचे समजले त्यानंतर मी माझ्या गाडीचा रोख पार्वती  गाव या भागाकडे वळवला 
पर्वती टेकडीच्या पायथ्याशी वसलेला हा भाग पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणारा आहे. संध्यकाळाच्या  वेळेस टेकडीवर जाणाऱ्या लोकांची वर्दळ, मंदिरे आणि शांत परिसर यामुळे मन प्रसन्न झाले. दिवसभर फिरण्यातून आलेला शीण कमी झाला पर्वती गाव बघून झाल्यावर मी माझ्या त्या दिवशीचे पुणे दर्शन संपवले .

मी पुण्यातल्या पेठांमध्ये  फिरताना आलेल्या अनुभवनविषयी लिहताना दुसऱ्या भागात सांगितले त्या प्रमाणे मी आता पिंपरी चिंचवड भागात फिरणार आहे त्यानंतर माझा पुणे शहरात फिरण्याचा राहिलेल्या सिह्गड रस्त्यावर फिरायला सुरुवात करणार आहेत्यावेळचेहे अनुभव मी त्यावेळी आपणास सांगेलच तूर्तास इतकेच 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे