पुणे शहराच्या वैभवशाली वारशाचे विद्यमान प्रतीक 'पेठा (भाग १ )

पुणे महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्ट्याच नव्हे तर शैक्षणिक सामाजिक सुधारणा, या साठी प्रसिद्ध असलेले तसेच भारताच्या औद्योगिक विकसत भरीव वाटा उचलणारे भारताला मोठ्या प्रमाणात परकीयचलन  मिळवून देणारे शहर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे  .पुणे शहर आपल्या अनेक  इतर ठिकाणी सहजा न आढळणाऱ्या  गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे .पुणे शहारत असणाऱ्या काही गोष्टी पेठांची परंपरा या सोलापूर,जळगाव या शहरात दिसतात . मात्र पुणे शहरातील या पेठा आणि इतर शहरातील पेठा या फक्त नावाला सारख्या आहेत बाकी या मध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे . आपण ज्या शहरात राहतो त्या शहराची आपणास माहिती असावी म्हणून मी काही दिवसापूर्वीच या पेठांना भेट दिली त्यावेळी मला आलेल्या अनुभवाचे हे कथन मी आतापर्यंत जे पुणे शहरात राहिलो त्यासारख्या जवळपास ९७ ते ९८ भाग मी सदाशिव पेठ, नवी पेठ आणि नारायण पेठांमध्ये घालवला आहे .या माझ्या नेहमीच्या रुळलेल्या अनुमानांपेक्षा माझा इतर पेठांतील अनुभव खूपच उत्तम होता 

पुणे शहरातील   पेठा या प्रामुख्याने पेशवेकालीन नियोजनातून विकसित झालेल्या असून त्या काळात विशिष्ट व्यवसाय, व्यापारी वर्ग किंवा कारागीर यांच्यासाठी विभागल्या गेल्या होत्या. पुणे मधील या पेठांमध्ये आजही त्यांचा प्रवाह टिकून राहिलेला दिसतो.  शहरातील एकूण पेठांची संख्या १७ आहे ,या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणातवैविध्य आणि नाविन्यता आहे मात्र यांचे वर्गीकरण  करायचे झाल्यास आपण त्यांच्या वारांचे नाव असलेल्या पेठा जसे सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ आणि अन्य नाव असलेल्या पेठा असे करू शकतो .पुणे शहरात आठवड्याच्या सातही  वारांचे नाव असलेल्या पेठा आहेत. या खेरीज कसबा, सदाशिव, नारायण,रास्ता, नाना ,भवानी,नवी गणेश  आणि गणेश, महात्मा फुले ,घोरपडे या पेठा आहेत .

मी पुणे शहरातील पेठांची माहिती घेताना या सर्व पेठांना किमान धावती तरी भेट दिली आहे. सर्व पेठांना सविस्तर भेट देण्याचे ठरवले तर सर्व काम धंदे सोडून किमान दोन ते तीन महिने दररोज किमान ९ ते १० तास तेच करावं लागेल इतक्या त्या मोठ्या आहेत. जे मला काहीसे शक्य नाहीये. मात्रदुधाची तहान ताकावर या मराठी म्हणी प्रमाणे शक्य तितक्या भागाला प्रत्यस्ख भेटी देत मी ही  माहिती मिळवली आहे. आपण या पेठांचे शनिवार वाड्या पासून स्वारगेटकडे जाताना डाव्या हाताला लागणाऱ्या पेठा आणि उजव्या हाताला लागणाऱ्या पेठा असे ढोबळ वर्गीकरण करू शकतो  तसेच लेखात सुरुवातीला सांगितले तसे आठवड्याच्या वारांच्या पेठा आणि अन्य नाव

असलेल्या पेठ असे करू शकतो. मी दुसरा अर्थात आठवड्याच्या वारांच्या पेठा आणि अन्य नाव असलेल्या पेठा हा पर्याय वापरत मला पेठामध्ये फिरताना काय अनुभवलं  आले ते मांडता आहे . मी हा पेठांचा प्रवास २७ मार्श ते १० एप्रिल या दरम्यान केला मात्र काही कामात बिझी असल्याने ते आता एप्रिल  च्या शेवटच्या आठवाड्यत मांडत आहे मी हा प्रवास स्वतःच्या गाडीद्वारे ,पी एमपीएम एल बस आणि मेट्रो अशी रिक्षा सोडून  सर्व प्रकारच्या वाहनातून केला आहे 

कसबा पेठ  ही पुण्याची सर्वात जुनी व मध्यवर्ती पेठ मानली जाते. येथे पारंपरिक घरे, वाडे आणि मंदिरे यांचे प्रमाण जास्त असून नागरी वस्ती दाट आहे. व्यवसायाच्या दृष्टीने येथे लहान किरकोळ दुकाने, पूजासाहित्य, भाजीपाला आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने आढळतात. मोठ्या व्यापारी बाजारपेठेपेक्षा ही पेठ स्थानिक गरजांवर आधारित आहे. ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासनिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्यामुळे येथे निवासी वस्तीचे प्रमाण जास्त असून व्यापारी विस्तार मर्यादित आहे. सदाशिव पेठ सदाशिव पेठ ही पुण्याची सांस्कृतिक व निवासी केंद्र मानली जाते. येथे शिक्षणसंस्था, मंदिरे आणि पारंपरिक कुटुंबे मोठ्या प्रमाणावर आहेत. कपडे, पारंपरिक वस्त्र, खाद्यपदार्थ आणि लहान दुकाने आहेत, पण मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण नाही. नागरी वस्ती प्रामुख्याने जास्त आहे. नारायण पेठ नारायण पेठ ही निवासी आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. येथे

पुस्तकांची दुकाने, शैक्षणिक साहित्य, लहान उद्योग आणि सेवा व्यवसाय आहेत. विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मोठ्या प्रमाणात राहतात. व्यापारी क्रियाकलाप मध्यम आहेत.रास्ता पेठ रास्ता पेठेत निवासी व व्यापारी दोन्ही स्वरूप दिसते. येथे दुकाने, कार्यालये, लहान उद्योग आणि विविध सेवा व्यवसाय आहेत. नागरी वस्तीही चांगली आहे. ही पेठ मिश्र वापरासाठी ओळखली जाते.नाना पेठ ही प्रामुख्याने घाऊक बाजार आणि गोदामांसाठी ओळखली जाते. येथे ट्रान्सपोर्ट, धान्य, मसाले, आणि इतर व्यापारी व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. निवासी वस्ती कमी आणि व्यावसायिक वापर जास्त आहे.भवानी पेठेत औद्योगिक आणि व्यापारी स्वरूप जास्त आहे. येथे गोदामे, ट्रान्सपोर्ट, बांधकाम साहित्य आणि लघुउद्योग आहेत. नागरी वस्ती कमी असून कामगार वर्गाचे प्रमाण जास्त आहे.गणेश पेठ ही व्यापारी व निवासी मिश्र स्वरूपाची आहे. येथे लहान दुकाने, वर्कशॉप्स आणि सेवा व्यवसाय आहेत. नागरी वस्ती मध्यम प्रमाणात आहे.घोरपडे पेठेत कामगार वर्गाची वस्ती आणि लघुउद्योग दिसतात. येथे निवासी वस्ती जास्त असून छोटे व्यवसाय आहेत. मोठे व्यापारी केंद्र नाही.महात्मा फुले पेठही पेठ घाऊक बाजार, गोदामे आणि व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथे मसाले, धान्य आणि इतर वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. निवासी वस्ती कमी आहे.नवी पेठ ही तुलनेने आधुनिक व निवासी भाग आहे. येथे शांत वस्ती, शिक्षणसंस्था आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत. व्यापारी क्रियाकलाप मर्यादित आहेत.

मी लेखाच्या सुरुवातीला सांगितले की ,पुणे शहरातील सर्व पेठांचा एकत्रित अनुभव मांडणे निवळ अशक्यच तरी राहिलेल्या पेठामधील माझा अनुभव मी याच लेखमालिकेच्या दुसऱ्या भागात मांडतो तो पर्यत सर्वाना जय महाराष्ट्र 




---


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

पर्यटनाच्या निमित्ताने भाग 6

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे