पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक १०(मला प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि समस्या )

इमेज
           मी एसटी बसचा वापर करतो,हे एव्हाना आपणास माहिती असेलच.एसटीच्या उपलब्धतेनुसार माझ्या पुर्वनियोजित कार्यक्रमात बदल देखील होतो हेही आपणास माहिती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.काही अत्यंत तूरळक घटनांचा अपवाद वगळता हे बदल खुपच किरकोळ स्वरूपाचे असतात.काही अत्यंत अपवादत्मक घटनेत मात्र हे बदल पुर्णत:180अंशात माझी भटकंती 100 टक्के बदलणारे असतात. असाच एक फिरणे 100 टक्के बदलण्याचा अनुभव मला गेवराईच्या फिरण्याचा दरम्यान आला.माझे आजचे लेखन तो अनुभव आपणापर्यत पोहोचवण्यासाठी          तर मित्रांनो, पुणे शहरातून गेवराईला जाण्यासाठी मी पुणे ते आहिल्यानगर आणि तेथून पुढे अहिल्यानगर ते गेवराई असे नियोजन केले होते. मी नगरला जाण्यासाठी निवडलेली बस कर्नाटक ची असल्याने ती माळीवाडा किंवा स्वस्तिक बसस्टँडला न येता तारकपूर बसस्टँडवरुनच पुढे शिर्डीला जणार होती.त्यानुसार मी तारकपूर बसस्टँडला सकाळी साडेसहा वाजता आल्याने चौकशी खिडकी बंद होती.त्यामुळे तेथील एका कंडक्टरला गेवराई बसेस कोठून सुटतात असे विचारल्यावर  त्यांनी माळीवाडा असे उत्तर दिल्या...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ९ (माझे आवडते पर्यटनस्थळ )

इमेज
मला अनेकजण विचारतात . अजिंक्य,  तू इतके फिरतो, त्यातील तुझे सर्वात आवडते पर्यंटन स्थळ कोणते ? माझे आजचे लेखन या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. तर मित्रांनो माझ्या आवडीची अनेक स्थळे आहेत.काही स्थळे मला तिथे जाण्याची आणि राहण्याची  सोय फार उत्तम असल्याने आवडली आहेत. काही स्थळे तेथील निसर्ग सौदर्यांमुळे आवडली आहेत. तर काही तिथे गेल्यामुळे मिळणाऱ्या शांततेमुळे आवडली आहेत. तरी या सर्वांचा एकत्रित विचार करता मला आवडलेले सर्वात उत्तम स्थळ आहे . गुजरातच्या डांग जिल्हयात असणारे सुब्बीर या तालुक्या मुख्यालयाच्या जवळ असणारे शबरीधाम - पम्पा सरोवर  हे ठिकाण .या ठिकाणी मी गेल्या वर्षी 2025 ला एप्रिल 13 रोजी भेट दिली. नाशिकहून गेल्यास एका दिवसात सहज फिरून होण्यासारखे हे ठिकाण आहे .ज्यांना नाशिकहून १५० किमीच्या च्या परिसरातील स्थळे बघायची आहेत जी फारशी परिचित नाहीत त्याच्यासाठी स्वर्ग म्हणून हे स्थळ बघता येईल,मंदिर अर्ध्या तासात सहज बघून होते तसचे तलाव देखील एका तासात सहज बघून होतो त्यामुळे जायला  येयला प्रत्येकी २ तास स्थलदर्शनाला एक ते दीड तास आणि अन्य एक तास सात ते आठ तासात आपले हे ...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ८

इमेज
मी माझ्या फिरण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर करतो जर एसटी बसचा वापर शक्य नसेल तर मी खासगी बस वाहतूकदारांचा वापर करतो . अन्य खासगी वाहतूक साधनांचा वापर मी जवळपास शून्यच्या बरोबरीने वापर करतो. हे माझ्या प्रवासाबाबतच पुरेशी माहिती असणाऱ्या अनेकांना एव्हाना चांगलेच माहिती झाले असेल. जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीला मी एसटी बसचा चाहता आहे हे समजते त्यावेळी  काही वेळा  काय हे एसटी आवडू कशी शकते ? एसटी बस पेक्षा इतर प्रायव्हेट ऑपरेटर खूप ऊत्तम सेवा देतात. त्यांचा वापर करायला  काय जाते. पॆसे जवळपास सारखेच लागतात. या प्रतिक्रयेला मला सामोरे जावे लागते . काही जणांचा रोख सार्वजनिक बसवाहतुकी पेक्षा स्वतःचे वाहन काढून फिरण्यास प्राधान्य देण्यास असतो त्यांच्यामते कुठे बसची वाट बघायची बस ठीक ठिकाणी थांबत जाणार त्यात विनाकारण वेळ वाया जाणार तसेच बसमधील सहप्रवासी कसा असेल तो विक्षिप्त असेल तर काय सर्व प्रवाशाची मजाच जाणार . त्या पेक्षा स्वतःचे वाहन काढायचे हवे त्या ठिकाणी थांबायचे ते देखील हवे तेव्हडा वेळ .पूर्णतः स्वतःच्या मानाने फिरायचे   हे दोन्ही दृष्टिकोन त्यांच्या त्...