पोस्ट्स

मार्केंडेय ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला गड मार्केंडय !

इमेज
  आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण आणि उर्वरीत महाराष्ट्राला वेगळी करणारी पर्वतरांग म्हणजे सह्याद्री पर्वतरांग . उत्तरेला साल्हेर मुल्हेर या डोंगरी किल्यापासून सुरु होवून कोल्हापूरला संपणारी ही डोंगररांग . जर मुख्य शाखेचा विचार केला असता सुमारे 600 किमी ( नाशिक पुणे रस्त्यावर लागणारे घाट या सह्याद्रीच्या उपशाखेमुळे लागतात , या उपशाखा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत ) या डोंगररांगेत अनेक देवस्थाने आहेत . त्यापैकीच एक म्हणजे राम रावण युद्दात लक्ष्मण मुर्च्छीत होवून पडल्यावर   त्याचे प्राण वाचवण्यासाठी भगवान हनुमान हिमालयातून संजिवनी वनस्पतीचा डोंगर घेवून जात असताना त्याचा पडलेल्या तूकड्यावर वसलेले देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धै पीठ असणारे   शक्तीपीठ अर्थात सप्तश्रूंगी . या सप्तश्रूंगी पर्वतासमोरच अजून एक पर्वत आहे . ज्यावर ध्यानस्थ होवून मार्केंडेय ऋषींनी सप्तशतीचा पाठ केला , जो देवीने ऐकला असी श्रद्धा आहे तो म्हणजे मार्केंडयचा डोंगर . .    ...

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

इमेज
    मी नुकतीच म्हणजे वार रविवार , 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा ) या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली , ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी   शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी , सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला   जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या    दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150 किमीवर ...

अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे असणारा जिल्हा ........ जळगाव

इमेज
आपण अनेकदा एखाद्या गोष्टीला एखाद्या विशिष्ट चष्म्यातूनच बघतो .  त्या गोष्टीला इतर अनेक पैलू   असू शकतात हे आपल्या गावीही नसते . उदाहरणार्थ जळगावला गेल्यावर पर्यटन स्थळे बघायची असल्यास जा अजिंठा वेरूळला वगैरे . मात्र जळगावला गेल्यावर अजिंठा आणि वेरूळ सोडून अनेक बघण्यासारखी स्थळे आहेत जसे साडेतीन गणपतींपैकी एक पूर्ण पूर्ण गणपतीचे स्थान असणारे पद्मालय , ( पुणे परिसरात असणाऱ्या अष्टविनायकांखेरीज महाराष्ट्रात गणपतींची साडेअकरा स्थाने आहेत .  ज्यामध्ये नागपूर परिसरात  असणाऱ्या 8 गणपतीचा तसेच या साडेतीन गणपतींचा समावेश होतो ), तसेच उनपदेव आणि मनुदेवी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणासह अमळनेर येथील भारतातील मोजक्या ठिकाणी असणाऱ्या मंगळाचे   मंदिर वगैरे . मी नुकतीच यातील अमळनेर येथील मंगळाच्या मंदिराखेरीज अन्य तीन ठिकाणी भेट दिली . त्या प्रसंगी मला जाणवलेले तेथील स्थानमहत्व तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन .           म...