एक दिवस रावसाहेबाच्या नगरीत
मराठीतील एक ख्यातनाम सिद्धहस्त लेखक म्हणून आपण पु. ल. देशपांडे यांना ओळखतो. पु. ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ या लेखनासह त्यांनी आपल्या प्रतिभेने साकरलेली व्यक्तिचित्रे सुद्धा मोठ्या संख्येने प्रसिद्व आहेत.या व्यक्तिचित्रांपैकीच एक म्हणजे सहज बोलता बोलता शिव्या देणारे, प्रचंड तिखट खाणारे मात्र आतुन अत्यंत प्रेमळ स्वाभाव असणारे बेळगावचे रहिवासी रावसाहेब. बेळगाव, आपल्या मराठी भाषिकांची अस्मिता, जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजे बेळगाव.तर या बेळगावला मी नुकतीच माझ्या 'एक दिवशीय भ्रमंती' या उपक्रमाद्वारे भेट दिली. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे सार मंडण्यासाठी प्रस्तूत लेखन तर वाचक मित्र मैत्रींणोंनो, माझ्रा एकदिवशीय भ्रमंतीची सुरवात नेहमीप्रमाणे झाली ती रात्री अकरा वाजता, पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या शिर्डी -बेळगाव नॉन एसी स्लिपर बसने. या बसने प्रवास करत पावणे सहाच्या सुमारास मी बेळगावच्या बसस्टँडवर पोहोचलो.बेळगावचे बसस्टँड मोठे असून या ठिकाणी ३७ प्लॅटफॉर्म आहेत.मी गेलो त्यावेळी नुकतेच उजाडत होते.माझ्या आतापर्यंत अनुभवानुसार परक्य...