साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे
आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात पर्यटनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो. लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने बाहेर काढण्यासाठी अध्यात्म, पुण्याचे संकलन आदी संकल्पनाच्या आधार घेत विविध धार्मिकस्थळे निर्माण केलेली आहेत. .त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडगाव कांशबिंगे हे साडेतीन गणपतीपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थान होय. या स्थानाला मी नुकतीच भेट दिली.मनाला नवी ऊर्जा देणारा अनुभव होता तो हो,, ! गणपतींची सुद्धा साडेतीन स्थाने आहेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांना मी काहीतरी चुकीचे सांगतोय साडेतीन स्थाने तर देवीची आहेत गणपतीची नाहीत असे वाटू शकतो . माझा अष्टविनायक आणि देवीची साडेतीन शक्तिपीठे यामध्ये गल्लत झाली तर नाहीना असे वाटू शकते .तर त्यांना माझे सांगणे आहे की हो गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत. गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे.गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध केल्याने त्या राक्षसाच्या इच्छेनुसार गणपतीला मयुरेश्वर हे नाव मिळाले तर या मयुरेश्वर या नावाच्...