वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ
जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन. आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वलसाड...