रामायणातील महत्त्वाचे स्थान ' शबरीधाम'
रामायण , आपल्या भारतीयांच्या मनामनात वसलेले महाकाव्य. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन करणारा ग्रंथ. प्रभू श्रीराम असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान . त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तीर्थस्थानांची यात्रा अनेकजण भक्तिभावाने करतात. मला सुद्धा या पैकी एक महत्वाचे तीर्थस्थान असलेल्या 'शबरीधाम' या तीर्थस्थानाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली त्यावेळी मला आलेय अनुभवांचे अनुभव कथन तर मित्रानो आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असण्याच्या हे संभव आहे की,मी गेल्या काही वर्षापर्यत माझा ऑफिसच्या साप्ताहिक सुट्टीत एसटी बसच्या मदतीने एकदिवशीय तीर्थाटन, पर्यटन करत असे मा पर्यटनात मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, इंदौर, गोवा, कर्नाटकचा काही भाग या ठिकाणी फिरलो आहे. मात्र जून २०२३ला माझ्या वडिलांच्या अकस्मित अपघाती निधनानंतर त्यास मोठा ब्रेक लागला. तो ब्रेक मोडीत काढत, पुन्हा नव्या जोमने माझा हा उपक्रम सुरु करण्याची माझी इच्छा होती. मात्र त्यास मुहूर्त लागत नव्हता. अखेर रविवार १३ एप्रिल २०...