पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्याने ......(भाग २ )

इमेज
        केल्याने देशाटन शहाणपण येते असे आपल्याकडे म्हंटले जाते . आता ते कितपत खरे  वादाचा मुद्दा होऊ शकतो .मात्र विविध ठिकाणी फिरल्याने आपल्याकडे अनुभव मात्र खूप येतो याबाबत दुमत नसावे . मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून एसटीच्या विविध योजनांचा यथेच्छ फिरत आहे त्यामुळे या बाबत मी खात्रीने सदर गोष्ट १०० % खरी असल्याचे सांगू शकतो असो     मी एसटीच्या विविध  योजनेचा फायदा घेत आतापर्यंत विदर्भाचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेशमधील इंदोर परिसर , गुजरातमधील वापी वलसाड सुरत व्यारा , सोनागढ चिखली सापुतारा अंकलेश्वर , भरूच , बडोदा आदी ठिकाणी फिरलो आहे या प्रवासात  चमत्कारी  घटना अनुभवल्या आहेत    .  मी रत्नागिरी जिल्ह्यात कोणती पर्यटनस्थळे आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्था कशी आहे याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरून घेत असताना माहिती घेत असताना रत्नागिरीपासून नजीकचा विमानतळ हा पणजीच्या विमानतळ असल्याची माहिती मला मिळाली तुम्ही म्हणाला यात गंमत ती काय ? तर मी त्यांना सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर म

पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नशील मात्र दुर्लक्षित जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा )

इमेज
         आपला महाराष्ट्र पर्यंटनस्थळाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे . राज्याचा असा कोणताही जिल्हा नाही कि ज्यात पर्यटनस्थळ नाही कोल्हापूर पासून नंदुरबार आणि मुबई शहर पासून गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यात आपणास पर्यटन स्थळे आढळतात . मात्र काही जिल्हे खास पर्यटनासाठी ओळखले जातात तर काही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसे अपरिचित आहेत परुंतु त्या जिल्ह्यत पर्यटनस्थळे नाहीत असे नाही अश्याच पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा अपरिचित मात्र पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्धी होण्यासाठी धडपडणारा जिल्हा म्हणजे  उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा ) ,महाराष्ट्रात पालघर या जिल्ह्याच्या अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याची जिल्ह्याचे नाव नंतर एनआयसी इन या डोमिन नेमखाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे (पालघरला डोमेन नेम जीओव्ही इन आहे )  ज्यामध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिलेली असते  तशीच ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे . मात्र उमसनबाद जिल्ह्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती हितालुक्यानुसार  देण्यात आली आहे मी बघितलेल्या अन्य जिल्ह्याच्या वेबसाईटव