पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

इमेज
    मी नुकतीच म्हणजे वार रविवार , 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा ) या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली , ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी   शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी , सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला   जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या    दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150 किमीवर असणाऱ्या बडोदा ( गुजराती

अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे असणारा जिल्हा ........ जळगाव

इमेज
आपण अनेकदा एखाद्या गोष्टीला एखाद्या विशिष्ट चष्म्यातूनच बघतो .  त्या गोष्टीला इतर अनेक पैलू   असू शकतात हे आपल्या गावीही नसते . उदाहरणार्थ जळगावला गेल्यावर पर्यटन स्थळे बघायची असल्यास जा अजिंठा वेरूळला वगैरे . मात्र जळगावला गेल्यावर अजिंठा आणि वेरूळ सोडून अनेक बघण्यासारखी स्थळे आहेत जसे साडेतीन गणपतींपैकी एक पूर्ण पूर्ण गणपतीचे स्थान असणारे पद्मालय , ( पुणे परिसरात असणाऱ्या अष्टविनायकांखेरीज महाराष्ट्रात गणपतींची साडेअकरा स्थाने आहेत .  ज्यामध्ये नागपूर परिसरात  असणाऱ्या 8 गणपतीचा तसेच या साडेतीन गणपतींचा समावेश होतो ), तसेच उनपदेव आणि मनुदेवी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणासह अमळनेर येथील भारतातील मोजक्या ठिकाणी असणाऱ्या मंगळाचे   मंदिर वगैरे . मी नुकतीच यातील अमळनेर येथील मंगळाच्या मंदिराखेरीज अन्य तीन ठिकाणी भेट दिली . त्या प्रसंगी मला जाणवलेले तेथील स्थानमहत्व तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन .           मी नेहमीप्रमाणे माझ्या प्रवासाची   सुरवात केली ती   शनिवारी रात्