पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्याने ......

इमेज
आपण अनेकना सांगताना बघतो की ,  मी पर्यटनाच्या निमित्याने   अनेक भागांमध्ये , शहरात फिरतो . मात्र एका प्रश्नाचे ते अजिबात उत्तर देत नाहीत , तो म्हणजे पर्यटन करतात , म्हणजे   ते नक्की काय करतात ? ते ज्या नव्या प्रदेशाना भेटी देतात , तिथल्या लोकांमध्ये सहभागी होतात ? तेथील स्थानिक परिवहन व्यवस्थेने फिरतात की ? की तेथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात ? मी स्वतः अनेकदा विविध राज्यांच्या परिवहन सेवा जसे गुजरात राज्य परिवहन महामंडळ , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळ वगैरे . आदींनी फिरतो . मी संबंधित ठिकाणी फिरण्यासाठी प्रामुख्याने सध्या बसेस वापरतो . तसेच बसेसमध्ये शक्यतो खिडकीची जागा घेण्याचा माझा कल असतो . प्रवास रात्रीचा असेल तरी मी प्रवासात शक्यतो झोपत नाही . रात्रीच्या अंधारात काय बघतो ? असा सहप्रवाशांच्या प्रश्न असतो . मात्र मी खिडकीची जागा शक्यतो सोडत नाही . मला मी ज्या शहारत जातो , तेथील ऐतिहासिक स्थळांपेक्षा स्थानिक परिवहन सेवांमार्फत

नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका संगमनेर

इमेज
आपल्या महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक , ऐतिहासिक आणि आध्यत्मिक   गोष्टीनी समृद्ध अनेक स्थळे आहेत . ही स्थळे जर आपणास एकाच वेळी बघायची असल्यास , आपणास ज्या मोजक्या ठिकाणांना भेट देणे क्रमप्राप्त आहे , अश्या ठिकाणाची यादी केल्यास त्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यावेच लागेल , ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात वायव्य दिशेला असणाऱ्या संगमनेर तालुक्याचे              . या तालुक्यातील पेमगिरी या गावात आपणास ऐतिहासिक आणि नैसर्गिक गोष्टींचा मिलाफ बघायला मिळतो , तर त्याच संगमनेर तालुक्यात असणाऱ्या खांडेश्वर आणि निर्झरेश्वर या ठिकाणी आपणास   आध्यत्मिक गोष्टीचा प्रत्यय येतो . मी नुकतीच अश्या   नैसर्गिक , ऐतिहासिक ,  आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका असणाऱ्या संगमनेर तालुक्यात   माझ्या फेसबुक मित्रांच्या सहकार्याने नुकतेच फिरून आलो , त्यावेळी मला आलेले   अनुभव आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन .                                मित्रानो ,   मी राहतो त्या नाशिकपासून हाकेच्या अंतरावर   संगमनेर