पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अ _ह _म_द_न_ग_र मधील एक दिवस -

इमेज
  आपल्या महाराष्ट्राला अत्यंत गौरवशाली इतिहास   लाभलेला आहे हे आपण जाणताच ,  त्याचप्रमाणे अनेक भौगोलिक चमत्कार सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहेत . त्यामुळेच असेल कदाचित देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आपल्या महाराष्ट्रात आहेत , आणि हे सर्व जर आपणास एकाच वेळी बघायचे असेल तर .? आपणास महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला अर्थात अहमदनगर जिल्ह्याला भेट देणे क्रमप्राप्त आहे .  काय नाही ,  अहमदनगर जिल्ह्यात ? संत ज्ञानेश्वर यांना लोकभाषेतून गीतेवरील भाष्य स्फुरले ते याच अर्थात अहमदनगर जिल्ह्यात अख्या भारताला सहकाराच्या मंत्र याच अहमदनगर जिल्ह्यातून देण्यात आला .  कोळशाच्या राखेतून उभारलेले भारतातील पहिले धरण   भाटघर धरण हे याच जिल्ह्यातील . एक महत्वाचा नैसर्गिक चमत्कार असणारे 4 एकरावरील वडाचे झाड याच जिल्ह्यातील . या   अश्या विविधतेने नटलेल्या जिल्ह्याचे मुख्यालय अर्थात अहमदनगर शहराची बातच काही और . एकेकाळचे उत्कृष्ठ शहरनियोजनाचा मापदंड ठरवणारे शहर म्हणजे अहमदनगर , आपल्या भारतातील