पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छोटे टूमदार शहर संगमनेर

इमेज
  आपण अनेकदा आपला प्रदेश सोडून अन्य क्षेत्रात पर्यटनास जातो जसे भारतातील लोक युरोप आणि अमेरिकेत पर्यटनास जातात . आपलाच प्रदेश आहे आपण कधीही जाऊ शकतो या गैरसमाजातून खूप लोक जगात अन्य प्रदेश मोठ्या प्रदेशात बघतात , मात्र   त्यांचा ते रहात असणाऱ्या प्रदेशाचा   जवळचा प्रदेश बघण्याचे राहून जाते . हे टाळण्यासाठी मी पुण्यात असताना दर रविवारी फिरायला जात असे .  तेव्हा मी पुणे परिसरातील   सर्व \ किल्ले , धार्मिक स्थळे   बघून झाल्यावर अन्य ठिकणी भेट दिली ज्यामध्ये इस्लामपूर ,  विटा , करमाळा ,  शिरूर , मलकापूर    मोहोळ , टेंभुर्णी कोकरूड सोलापूर , सांगली , सांगोला   कोल्हापूर आदी अनेक ठिकाणांचा समावेश करावा लागेल .  मी   साप्ताहिक सुट्टीचा   दिवसात ही स्थळे बघितली आहेत सध्या मी नाशिकला आहे . सध्या   करोनामुले बिघडलेली स्थिती पूर्वपदावर येत आहे . त्याचा विचार करून मी माझा   हा उपक्रम   पुन्हा सुरु करत आहे . पुण्यामध्ये असताना माझी दर साप्तहिक सुट्टी पुण्याबाहेर असे इतक्या नित्यनिन्यमाने आत

केल्याने दुर्गपर्यटन

इमेज
  निसर्गाच्या सानिध्यात राहलो तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो , असे वैद्यकशास्त्रातील मान्यवरांचे म्हणणे असते . यामुळे रोजच्या धक्काधकीचा जीवनातून वेळात वेळ काढून लोक निसर्गाचा सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात . त्यासाठी ते विविध किल्यांवर थंड हवेच्या ठिकाणी , वनांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात . सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत खऱ्या विविध वनस्पतीच्या जंगलात जातात . मी सुद्धा त्यास अपवाद नाही . आणि त्यासाठीच मी विविध समाजोपयोगी कामे करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गवीरांच्या साथीने   5 सप्टेंबर रोजी नाशिकपासून जवळच असणाऱ्या कावनाई या किल्ल्याला भेट दिली .  कावनाई हा किल्ला नाशिकपासून हाकेच्या म्हणजेच सुमारे 55 किमी आहे . नाशिकहून इगतपूरी कडे जाताना घोटीच्या आधी उजव्या हाताला एक फाटा फुटतो , त्या फाट्यातून सुमारे सात आठ किमी प्रवास केला की आपण किल्ल्याचा पायथ्यासी पोहोचतो . किल्ला हा टेहळणीसाठी वापरण्यात येत होता . किल्ल्याची चढाई सोपी या प्रकारातील आहे . सुमारे अर्धा ते पाउण तासात आपण सहज